जळगाव - सर्वसामान्यांच्या वाहनावर जर क्रमांक नसेल तर वाहतूक पोलिस तत्काळ कारवाई करतात. मात्र जळगाव महापालिकेचे चार ट्रॅक्टर विना क्रमांक शहरात फिरत असूनही त्यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकाच वाहतुकीचे नियम मोडत असल्याची बाब समोर आली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास कोर्ट चौकात एका तरुणाला यापैकी एका ट्रॅक्टरने उडवून गंभीर जखमी केले. याबाबत पोलिसातही काही गुन्हा दाखल नाही.
नियम धाब्यावर
महापालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यापार्याने कर भरला नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करते. मात्र महापालिका प्रशासन स्वत:च जर वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात. मात्र महापालिकेची वाहने हे नियम धाब्यवर बसवून शहरात राजरोसपणे फिरत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वाहनांना ग्रीन सिग्नल दिला कि काय असा प्रश्न उभा ठाकतोय.
वाहन विभाग वादग्रस्त
वेळेच्या अगोदरच घंटागाड्या जागेवर लावणे, डिझेल चोरीचे प्रकार असे अनेक वेळा महापालिकेचा वाहन विभाग वादग्रस्त कारणांमुळे नेहमीच चच्रेचा विषय असतो. महापालिकेच्या मालकीच्या चार ट्रॅक्टरवर क्रमांकच नसल्याची बाब आता समोर आली आहे. शनिवारी कोर्ट चौकात त्यातील एका ट्रॅक्टरचालकाने गणेश कॉलनीकडे पायी जाणार्या मधुकर गोविंदा महाजन या तरुणाला उडविले. त्यात तो जखमी झाला.