आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दुल्ल्याने पोलिस मुख्यालयात घातला धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहर पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयात गर्दच्या नशेत बेधुंद झालेल्या एका तरुणाने धुमाकूळ घातल्याची घटना आज दुपारी घडली. हा तरुण गेंदालाल मिल भागात राहणारा ललित चौधरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे 3 तास हा गोंधळ सुरू होता.

ललितला दुपारी 4 वाजेच्या सुमारास काही युवकांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केले. तत्पूर्वी त्याने सकाळीच नशा करून गेंदालाल मिल भागात स्वत:चे डोके फोडून घेतले. परिसरातील काही युवकांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, ललितने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यामुळे त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात त्याने युवकांना शिवीगाळ केली. काहींना मारहाण करण्याचाही प्रयत्‍न त्याने केला. पोलिस ठाण्यातच त्यांची झटापट झाली. अशात पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. अर्धातास विश्रांती घेतल्यानंतर 4.30 वाजता ललितने पोलिस मुख्यालयात जावून शिव्या दिल्या. तीन तास त्याने गोंधळ घातला होता.