आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम मोडणार्‍या ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याला समज..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या झेब्रा क्रॉसिंग अभियानाची वाहतूक शाखेने गांभीर्याने दखल घेत या अभियानाचे स्वागत केले आहे. दरम्यान, बुधवारी प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातील वाहतुकीचे नियम मोडणार्‍या ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याला पोलिस उपअधीक्षक (गृह) वाय. डी. पाटील यांनी बोलावून लेखी समज दिली आहे.

वाहतुकीच्या कोंडीतून सुरक्षितपणे पायी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर बहुतांश जण वाहने उभी करत असतात. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. यासाठी ‘दिव्य मराठी’ने अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून झेब्रा क्रॉसिंगचा पट्टा ओलांडणार्‍या वाहनचालकांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येत आहे. मंगळवारी पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या राम महाजन यांनी आपले वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे केले होते. त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना बोलावून सूचना व लेखी समज दिली.


कारवाईसाठी जादा कर्मचारी
ज्या प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग ओलांडणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे, तेथे कारवाईसाठी नियमित वाहतूक कर्मचार्‍याबरोबरच एक जादा कर्मचारी नेमण्यात येणार आहे. हा कर्मचारी फक्त झेब्रा क्रॉसिंगबाबत कारवाई करेल.

हे आहेत नियम
0 रस्त्यावर सिग्नलजवळ असलेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असलेल्या स्टॉपलाइनवरच वाहनचालकांनी आपले वाहन उभे करावे.
0 जेव्हा सिग्नलवर लाल दिवा सुरू असतो, त्या वेळी पादचार्‍यांनी त्या पांढर्‍या पट्टय़ावरून चालत जावे.
0 झेब्रा क्रॉसिंगचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर मोटार व्हेइकल अँक्टनुसार 100 रुपये दंडाची कारवाई करण्यात येते.