आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव: 10 रुपयांचे नाणे बंदची अफवा; ग्राहक अन‌् दुकानदारांमध्ये वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव/भडगाव- नोटबंदी नंतर रिझर्व्ह बँकेकडून सहकार नियमात वारंवार बदल केला जात असल्याने आता व्यवहारात १० रुपयांच्या डाॅलर बंदीची अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहक दुकानदार यांच्यात वाद होत असून १० रुपयांचे बनावट नाेटा चलनात अाल्याची चर्चा बाजारात अाहे. मात्र, १० रुपयांचा डाॅलर बंद झाला नसल्याचा खुलासा बंॅक अधिकाऱ्यांनी केला. भडगाव चाळीसगाव येथील बंॅॅकांमध्ये २० लाख रुपयांची िचल्लर बंॅकांमध्ये जमा झाली. 

१० रुपयांच्या डाॅलरची चिल्लर दरराेज जमा हाेत असल्याने अाता बंॅकांनी हात वर केले असून चिल्लर स्वीकारण्यास ते ना करताय. ग्राहक विक्रेत्याने १० रुपयांचे नाणे घेऊन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावा, असे अावाहन बंॅक अधिकाऱ्यांनी केले अाहे. नोटबंदीच्या ५० दिवसांच्या अवधीनंतर अद्याप पूर्वपदावर आलेल्या बाजार पेठेला आता नोटबंदीनंतर चिल्लर १०चे डाॅलर बंदीची धास्त भरली आहे. त्यामुळे अचानक व्यवहार घराघरातील गल्ले फुटून मोठ्या प्रमाणात चिल्लर बाहेर आली आहे. दरम्यान नोटबंदीत बंॅकांनीही ती वाटप केली. दोन आठवडाभरातच या चिल्लर साठ्याला व्यापारी, ग्राहक वैतागले अाहेत. डाॅलर मोजण्याच्या धाकाने बंॅकाही हात वर करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत अचानक डाॅलर बंदीची अफवा सुरू झाली असून समज-गैरसमजामुळे व्यावसायिक लोकांमध्ये वाद निर्माण झाले आहे. काही दुकानात डाॅलर घेतले जात नाही. काही ठिकाणी ते बंद झाल्याचे सांगितले जाते. आम्ही सामान्य ग्राहक अाहाेत.

भाजीपाला, कुल्फी, पानटपरी, चहा विक्रेत्यांकडे १० रुपयांचे नाणेच काढले जातात. परंतु ते बंद पडल्याची अफवा पसरल्याने या लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झालाय. त्यामुळे अार्थिक व्यवहार ठप्प हाेत असल्याचे दिसून येत अाहे. याचा सर्वाधिक त्रास अशा लहान व्यावसायिकांनाच हाेताेय. बंॅकांमध्ये १० रूपयाचे डाॅलर लाखाेंच्या संख्येने साठल्याने अाता बंॅकांनीही डाॅलर घेण्यास ना केली अाहे. त्यामुळे मात्र बाजारात गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच १० रुपयांचे नाणे बंद नसल्याचे अधिकारी सांगताहेत. 

अनेकदा दुकानात जाऊन परतावे लागत आहे. त्यामुळे मोठा त्रास होताेय. व्यावसायिकांनी १० रुपयांचे डाॅलर स्वीकारली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भडगाव येथील संदीप पाटील या ग्राहकाने दिली. 

यात्रेत डाॅलरचीच चर्चा 
महाशिवरात्रीलाठिकठिकाणी भरलेल्या यात्रेत १० रुपयांच्या डाॅलरचीच चर्चा झाली. २० ते १०० रुपयांच्याच वस्तू यात्रेत जास्त मिळतात. त्यामुळे यात्रेत १० रुपयांचे नाणे अथवा १० ची नाेट जास्त चलनात येत असते. मात्र, नाणे घेण्यास विक्रेत्यांनी नकार दिला. 

दाेन महिन्यांपासून ग्राहक नाणे घेत नाही 
माझा भाजीपाल्याचा व्यवसाय असून पाच ते दहा रुपयांवरच आम्हाला व्यवसाय करावा लागतो. परंतु दीड ते दोन महिन्यांपासून दहा रुपयांचे नाणे आमच्याकडून ग्राहकच घेत नसल्याने आम्ही ते ग्राहकांकडून स्वीकारत नाहीत. यामुळे व्यवसाय करत असताना मोठ्या अडचणी निर्माण होत असून व्यवसाय थंडावला आहे.
- मीराबाई राठोड, भाजीपाला व्यावसायिक 

नाणे स्वीकारले नाही तर गुन्हे दाखल करा 
१०रुपयांचेनाणे चलनातून बंद झाले की नाही, याबाबत कुणीही अधिकृत सांगू शकत नाही. परंतु ग्राहक आमच्याकडून १० रुपयांचे नाणे घेण्यासाठी नकार देत आहेत. शनिवार म्हणजे बाजाराचा दिवस असल्याने १० रुपयांचे नाणे घेण्या-देण्यावरून अनेकदा वाद उद‌्भवले त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. नाणे स्वीकारणाऱ्यांवर शासकीय यंत्रणेकडून कारवाई करावी.
- शेख वसीम कालू, चहा विक्रेता 

नाणे अाम्ही घेताेय, ग्राहकांची मात्र ‘ना’ 
दहारुपयांचेनाणे घेण्याबाबत अद्याप शासन िकंवा बँकांचे कोणत्याही प्रकारचे आदेश आले नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या सोईसाठी आम्ही १० रुपयांचे नाणे स्वीकारत आहोत. परंतु अाम्ही १० रुपयांचे नाणे दिले असता काेणी घेत नाही. नाेटाबंदीच्या काळात बँकेनेही माेठ्याप्रमाणात नाणे चलनात आणले असून ही अडचण आहे. ग्राहकांनी बंॅकेचे अादेश पाळावे. त्यामुळे व्यवहार सुरळीत हाेतील. सहकार विभागाने याबाबत अादेश काढावा.
- हितेश सोलंकी, सराफा व्यावसायिक 

अफवेने व्यवसाय करणे झाले जिकरीचे 
दैनंदिन व्यवहार करत असताना ग्राहक १० रुपयांचे नाणे घेण्यासाठी नकार देत आहेत. नागरिक दुकानदारांमध्ये या नाण्यांच्या चलनाबाबत योग्य तो समन्वय होत नसून व्यवहारात अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील अनेक बँकेतही दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. काेणत्याही प्रकारची सूचना नाही. केवळ १० रुपयंाचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्याने व्यवसायाला अडचण अालीय.
- सुनील देशमुख. हॉॅटेल व्यावसायिक 
बातम्या आणखी आहेत...