आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रन फाॅर गुड हेल्थमध्ये धावले तीन हजार विद्यार्थ्यांसह नागरिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भाजपतर्फे रन फॉर गुड हेल्थ मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. खासदार ए. टी. पाटील, शहर भाजप क्रीडा आघाडीतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील दोन हजार ९९५ विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेत सुदृढ अाराेग्याचा संदेश दिला. तब्बल किमीचे अंतर पार करीत विद्यार्थी, नागरिक धावले. यात खुल्या गटात अभिमान माेरे तर शालेय गटामध्ये सुरेश बारेला यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
मनपाच्या सतरा मजली इमारतीपासून या मॅरेथाॅनची सुरुवात होऊन शास्त्री टाॅवर, चित्रा चाैक, काेर्ट चाैक, स्टेडियम चाैक, स्वातंत्र्य चाैक, अाकाशवाणी चाैकमार्गे ख्वाजामियाँ चौकातून नूतन मराठा महाविद्यालयाच्या रोडवरून खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयात समारोप करण्यात आला. उद््घाटन बक्षीस वितरणप्रसंगी खासदार ए.टी.पाटील, अामदार सुरेश भाेळे, भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अामदार गुरुमुख जगवाणी, अामदार स्मिता वाघ, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, क्रीडा अाघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू खेडकर, शरिफा तडवी, जयश्री पाटील, मनपा गटनेते सुनील माळी, अशाेक लाडवंजारी, चंदन महाजन, अमित भाटिया आदी उपस्थित हाेते. स्पर्धेत जवळपास २०० मुलींनी सहभाग नोंदवल्याने त्यांनाही पारितोषिक देण्यात आले. यात अार.अार.विद्यालयाची दीपा बाेरसे, काेमल साळुंखे यांना बक्षिसे मिळवली. विजेत्यांना राेख पारितोषिकांसह स्मृतिचिन्हे तर सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात अाले.


यांना मिळाले पारिताेेषिक
शालेय गट : प्रथम: सुरेश बारेला (अाश्रमशाळा डाेणगाव यावल), द्वितीय : प्रथमेश व्यवहारे (का.ऊ.काेल्हे विद्यालय), तृतीय : धनंजय काेळी (न्यू इंग्लिश स्कूल कढाेली), उत्तेजनार्थ : लक्ष्मण काेळी (न्यू इंग्लिश स्कूल भालाेद), दीपक कुंभार दीपक काेळी (माध्यमिक विद्यालय डांभुर्णी) यांना पारिताेेषिक मिळाले.

स्पर्धेसाठी ४० पंच
जिल्हा अॅथलेटिक्स असाेसिएशनचे सचिव प्रा. राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात अाली. असाेसिएशनचे ४० पंच अाणि निरीक्षकांनी काम पाहिले. गणेश पाटील प्रा.पी.अार.चाैधरी यांनी सूत्रसंचालन केले. यासाठी क्रीडा अाघाडीचे विलास नारखेडे, शरिफ पिंजारी, बाबा शिर्के, प्रा. यासिन तडवी, नामदेव हटकर, किरण चाैधरी, अक्षय राणे, नितीन पाटील, समीर परदेशी, स्वाती पाटील, राहुल चाैधरी नाथ फाउंडेशनचे सहकार्य मिळाले.

ब्लेड रनरचा सहभाग
दाेन्ही पायांनी अपंग असलेला ब्लेड रनर स्वप्निल शिंपी यानेदेखील सहभाग नोंदवत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शहरात विविध ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली होती. तसेच जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्य, डाॅक्टर, अार्किटेक्ट, काही नामांकित व्यक्तींनीही यात सहभाग नाेंदवला होता. तसेच राज्य बाॅल बॅडमिंटन स्पर्धेतील नाशिक विभागातील २५ खेळाडूंनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...