आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत पाेलिसाची महिलेला जबर मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई-भुसावळ पॅसेजरमध्ये बुधवारी दुपारी ३.३० वाजता माहेजी- म्हसावद दरम्यान अवैध खाद्य पदार्थ विक्रेता अाणि रेल्वे पाेलिसात वाद झाला. या वेळी विक्रेत्याच्या डाेक्यावरील भेळची टाेपली एका प्रवासी महिलेच्या अंगावर पडल्याने तिला दुखापत झाली.
या गाेष्टीचा जाब सदर महिलेने पाेलिसाला विचाराला असता, त्याने अापल्यालाच जबर मारहाण केल्याचा अाराेप पीडित महिलेने ‘दिव्य मराठी’कडे केला अाहे. दरम्यान याविषयी अारपीएफ निरीक्षकांनी महिला मारहाणीत नव्हे तर टाेपली पडल्याने जखमी झाल्याचे म्हटले अाहे.

नेरी वडगाव (ता.पाचाेरा) येथील प्रमिलाबाई नाना पाटील (वय ५८) या बुधवारी दुपारी ३.३० वाजता कजगाव येथून मुंबई-भुसावळ पॅसेंजरमध्ये जळगाव येथे मुलाकडे येण्यासाठी बसल्या. गाडी माहेजी ते म्हसावद दरम्यान असताना रेल्वे पाेलिस बलाचे जवान ए. डी. साेनवणे यांचा गाडीतील भेळच्या अवैध विक्रेत्याशी वाद हाेऊन बाचाबाची झाली.
जवानाने विक्रेत्याला मारहाण केल्याने त्याच्या डाेक्यावरील भेळची टाेपली प्रमिलाबाई यांच्या अंगावर पडली. त्यामुळे त्यांच्या डाेक्याला, नाकाला अाणि चेहऱ्याला जबर मार लागला. याचा जाब त्यांनी साेनवणे यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रमिलाबाईला धक्काबुक्की केली. या वेळी मुलगी स्वाती पाटील हिने साेनवणे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही त्यांनी ढकलून दिले. हा प्रकार पाहून गाडी प्रवास करीत असलेला प्रवासी भाऊसाहेब वाघ (रा. पिंप्राळा) यांनी दाेन वेळा चेन अाेढून गाडी थांबवली. त्या वेळी म्हसावद स्थानकावरील अधिकाऱ्यांनी डब्यात येऊन संबंधितांना जळगाव येथे तक्रार देण्यास सांगितले.

मारहाण केली नाही
अामचेजवान साेनवणे यांनी महिलेला मारहाण केलेली नाही. गाडीत अवैध विक्रेत्याला पकडताना त्याची भेळची टाेपली महिलेच्या अंगावर पडली. त्यात त्या जखमी झाल्या. या प्रकरणी काेणतीही तक्रार नाही. गाेकुळसाेनाेनी, निरीक्षक, रेल्वे पाेलिस बल

मुंबई-भुसावळ पॅसेंजरमधील संतापजनक घटना
मुंबई- भुसावळ पॅसेंजरमध्ये घडलेल्या घटनेने संतापलेल्या प्रमिलाबाई यांनी त्यांचा मुलगा प्रदीप पाटील (रा. पिंप्राळा) याला फाेनवरून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे प्रदीप धावतच रेेल्वेस्थानकावर अाला. त्याने रेल्वे पाेलिस बलाचे निरीक्षक गाेकुळ साेनाेनी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी सुरुवातीला बेशुद्ध अवस्थेतील प्रमिलाबाई यांना उपचारासाठी हाॅस्पिटलला दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार दाेन रेल्वे पाेलिस बलाचे जवान घेऊन प्रदीपने अाईला जिल्हापेठ परिसरातील निर्मल सेवा हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.

दारू पिऊन धिंगाणा
रेल्वेपाेलिस बलाचा कर्मचारी ए. डी. साेनवणे याने दारू पिऊन गाडीत धिंगाणा केला. प्रवाशांसह ताे ‌खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून पैसे गाेळा करीत हाेता. त्या वेळी वाद झाल्याने एका विक्रेत्याची टाेपली माझ्या अंगावर पडली. त्याला जाब विचारला असता, त्याने धक्काबुक्की करून मारहाण केली. प्रमिलाबाईपाटील, जखमी महिला