आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांकडे कॅशचा प्रचंड तुटवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चलनातील कोड नसलेल्या वर्षाचा उल्लेख नसलेल्या पांढ-या पट्टीच्या नोटा जमा करण्याचे सर्व बँकाना निर्देश दिले आहेत. कॅशएेवजी वर्गवारीचे व्यवहार अधिक करण्याचे रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत. नवीन आर्थिक वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांमध्ये देखील एकाच वेळी कॅशची मागणी वाढल्याने कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मार्च अखेरीस १५०० कोटी रुपयांची पीककर्ज वसुली केल्यानंतर जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेकडून नियुक्त केलेल्या बँकेकडे कॅशचा भरणा केला. कॅशचे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे असून मागणी आणि पुरवठ्यानुसार बँकेला कॅशचा पुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यात पीक कर्ज काढणा-या शेतक-यांची एकाच वेळी गर्दी झाल्याने जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेच्या सरासरीच्या व्यवहारांच्या तुलनेत शाखांना मिळणारी रक्कम कमी असल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या चलनात असलेल्या कोड आणि छपाईच्या वर्षाचा उल्लेख नसलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा केल्या जात आहेत. अशा नोटा जमा केल्या जात असल्याने व्यवहारात नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्टेट बँकेकडून मागणीप्रमाणे नोटा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

कॅशचे नियमन
दैनंदिनव्यवहारात रोखीचे व्यवहार करण्याएेवजी बँकांनी ई-व्यवहार, वर्गवारी, कॅशलेश व्यवहार करावेत, यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. मात्र, इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेत असे व्यवहार कमी होतात. राज्यात सर्वाधिक १८०० कोटीचे पीक कर्ज वितरित करताना हे सर्व कर्ज शेतक-यांना कॅश स्वरूपात द्यावे लागते. त्यामुळे इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेत कॅशचा तुटवडा अधिक आहे. बँकेला कॅशसाठी दुस-या बँकेवर अवलंबून रहावे लागत आहे.

नियोजन केले
एकाचवेळी कॅशची मागणी वाढली आणि त्या तुलनेत कॅश उपलब्ध नाही. पीक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या अधिक असल्याने जास्तीची कॅश उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्टेट बँकेकडे मागणी केली आहे. जितेंद्रदेशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक