आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rural Development Minister Pankaja Munde News In Marathi

संस्कार म्हणून योजना राबवा जनतेला आपल्याच वाटतील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय योजना ह्या केवळ सोपस्कार म्हणून राबवल्या जाता, त्या संस्कार म्हणून रुजवल्यास लोकांना त्या आपल्याशा वाटतील आणि मग या योजना नक्की यशस्वी होतील, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
माैलाना अाझाद अल्पसंख्याक अार्थिक विकास महामंडळातर्फे सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सव महिला बचतगट मेळावा झाला, या वेळी त्या बाेलत हाेत्या. पालकमंत्री एकनाथ खडसे अध्यक्षस्थानी हाेते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार रक्षा खडसे, अामदार स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे उन्मेश पाटील, महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अल्पसंख्याक विभागाच्या सहसचिव ऐनूल अत्तार आदी उपस्थित होते. मनोज गोविंदवार यांनी सूत्रसंचालन केले.
लिंगभेद नाही : महाजन
समाजातमुलींचे घटते जन्मप्रमाण ही चिंताजनक बाब आहे. मला दाेन्ही मुलीच अाहेत. तरीही मुलगा नाही म्हणून काही अडले नाही. मुलांपेक्षा मुलीच अधिक जीव लावतात. महिला सक्षमीकरण अावश्यक अाहे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. बहिणाबाई महाेत्सवात चर्चा करताना पंकजा मुंडे रक्षा खडसे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे गिरीश महाजन.

निसर्गाचे संतुलन बिघडले
निसर्गाचासमतोल हा केवळ पर्यावरणापुरता बिघडलेला नाही, तर तो स्त्री-पुरुष प्रमाणातही बिघडवला जातोय. हा समतोल कायम राखण्यासाठी पंतप्रधानांनी
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची सुरुवात केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर क्षुद्रबुद्धीने करून गर्भातच मुलींची हत्या करण्याचे दुष्कृत्य हे
सुधारलेल्या आणि सधन समाजातच अधिक दिसते. आदिवासी समाजात मुलींचा जन्मदर चांगला आहे. जळगाव, बीडसारख्या जिल्ह्यात मात्र ही स्थिती चिंताजनक अाहे.

सांस्कृतिक कार्यक्रम
महाेत्सवातविविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार अाहेत. महिला बचतगटांनी खाद्यपदार्थ, शाेभेच्या वस्तू अाणि
इतर साहित्याचे स्टाॅल विक्रीसाठी लावलेले अाहेत. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी खान्देशचा पोवाडा सादर केला तर ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ या
विषयावर विनोद ढगे यांनी पथनाट्य सादर केले. अल्पसंख्याक अार्थिक विकास महामंडळाकडून शिष्यवृत्ती, कर्ज मिळालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाट केले.

सामाजिक शिक्षण
मदरशांमध्येधार्मिक शिक्षणासोबत सामाजिक शिक्षण देण्यावर भर देणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्याही स्वच्छ आणि सुंदर व्हाव्यात यासाठी
शासनाने १०० कोटी रुपयांचा वेगळा निधी राखून ठेवला आहे, असे खडसे या वेळी म्हणाले.