आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rural Development Minister Pankaja Munde News In Marathi

राज्यात अधिकारांचे विकेंद्रीकरण करणार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विकासकामे वेळेत मार्गी लागावी, पाणीटंचाईसारख्या विषयावर लवकर निर्णय व्हावे तसेच छाेट्या कामांसाठी यंत्रणेचा वेळ वाया जाऊ नये, हा मुद्दा डाेळ्यासमाेर ठेवून राज्य शासन बदल्यांसह विविध विषयांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात अायाेजित ‘जलयुक्त शिवार अभियान’ ‘बेटी बचाओ, बेटी पढाअाे’ या अभियानाच्या अाढाव्यासाठी अायाेजित
बैठकीत बाेलत हाेत्या.
बहिणाबाई महाेत्सवाच्या उद्घाटनानिमित्त त्या जळगावात अाल्या हाेत्या. नियाेजन समितीच्या सभागृहात मुंडे यांनी अवघ्या २० मिनिटांत अौचारिक अाढावा घेऊन बैठक अाटाेपली.
या वेळी खासदार रक्षा खडसे, अामदार स्मिता वाघ,जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी के. एस. मुळे उपस्थित हाेते. मुंडे यांनी राेजगार हमी, महिला बालकल्याण, बेटी बचाअाे, बेटी पढाअाे, जलयुक्त शिवार या विषयावर दहा मिनिटे सभागृहाशी संवाद साधला.

देव्हारीयेथे कामाची पाहणी : मोठीआर्थिक गुंतवणूक असणारे धरणे बांधूनही अपेक्षित सिंचन क्षमता मिळत नाही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते, असे असताना कमी निधीत आवश्यकतेनुसार योजनांची आखणी करून ती राबवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. देव्हारी ता. जळगाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मुंडे यांच्या हस्ते गावातील जुन्या
पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ केला.

छाेट्या याेजनांवर भर
मोठ्याधरणांमुळे विस्थापन, पुनर्वसन यासारखे प्रश्न निर्माण होतात. त्यांना निधी जास्त लागतो आणि अपेक्षित सिंचन क्षमता वाढत नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान हे प्रत्येक गावाला त्याच्या वाटेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असल्याचे पंकजा मुंडे यांनी देव्हारी येथे कार्यक्रमात सांगितले. गरजेनुसार आवश्यक ती कामे करायची आणि त्या गावासाठी पाणी उपलब्ध करायचे, अशी ही योजना आहे. त्यामुळे हे अभियान नक्की यशस्वी
होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार गुलाबराव पाटील यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी
तर सूत्रसंचालन तहसीलदार गोविंद शिंदे यांनी केले.