आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक उपक्रम, संशाेधनावर चर्चा - ‘रुसा’ समितीची विद्यापीठाला भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, लाइफ सायन्सेस, यूआयसीटी केमिकल सायन्सेसमधील प्रयोगशाळांना रुसा समितीने साेमवारी भेट दिली. सदस्यांनी या प्रयोगशाळांमध्ये प्रॉडक्टच्या इंडस्ट्रीलायझेशनच्या आवश्यकतेनुसार सुविधा असल्याचे समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रशाळांचे संचालक विभागप्रमुखांसमवेत नावीन्यपूर्ण संशोधनावर चर्चा झाली.

विद्यापीठांमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन औद्योगिकीकरणासंदर्भात भविष्यात होणारा निधीचा विनियोग पायाभूत सुविधा, विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) समिती गठित केली आहे. या समितीने सोमवारी विद्यापीठास भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रम प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
या समितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास गायकर, अाैद्याेगिकतज्ज्ञ डॉ. नितीन माते, तरुण मलकानी, रूसाचे सहसंचालक डॉ.एस.बी. चौधरी, डॉ. संजय जगताप, नीलम पोल, डॉ. जया गोयल इशरत जहांॅ यांचा समावेश होता. सर्वप्रथम कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्याशी समितीच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा केली.

विद्यापीठातर्फे चार विभागांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांच्या सादरीकरणाच्या आधारावर या समितीने विद्यापीठाने औद्योगिक संबंध ठेवून प्रकल्प राबवण्याविषयी सूचना केल्या. तसेच चांगल्या उद्योगांशी सामंजस्य करार करून उद्योगसमूहातील तांत्रिक सुविधा, संशोधन-विकास प्रकल्प, शैक्षणिक गुणवत्ता सुधार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांचे आयोजन, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये विचारांचे अादान-प्रदान करण्याविषयी सूचना केल्या. विद्यापीठाने असे पाऊल उचलले असल्याचे मतही समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. उमविचे ‘रुसा’ समन्वयक तथा कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

मंगळवारी प्राचार्यांसमवेत हाेणार बैठक
नॅक (बंगळुरू)कडून मूल्यांकन पुनर्मूल्यांकन करणाऱ्या महाविद्यालयांच्या इक्विटी इनिशिएटिव्हजबाबत अनुदानित महिला, अल्पसंख्याक आणि आदिवासी भागातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांसमवेत मंगळवारी सकाळी ११.३० वाजता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रा. महाजन यांनी कळवली आहे.

विद्यापीठाच्या प्रगतीविषयी चर्चा
प्रा.डी.जी.हुंडीवाले, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.पी.पी.पाटील, प्रा. शोभा शिंदे, प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.एस.टी.इंगळे, प्रा.आर.एल.शिंदे, प्रा.ए.बी.चौधरी, प्रा. बी.एल.चौधरी, डॉ.विकास गिते यांच्याशीही समितीने नावीन्यपूर्ण संशोधन विद्यापीठाच्या प्रगतीविषयी चर्चा केली. तसेच आजपर्यंत ‘रुसा’तर्फे पायाभूत सुविधा विकासाकरिता प्राप्त झालेल्या पाच कोटी रुपयांच्या विनियोगासंदर्भात डॉ. संजय जगताप प्रा.ए.एम.महाजन यांनी चर्चा केली.

समिती सदस्यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र शासन आणि ‘रुसा’च्या माध्यमातून विद्यापीठ उद्योगांचे व्यावसायिक संबंध वाढवण्याविषयी पुढाकार घेतला अाहे, असे समितीचे समन्वयक डॉ. गायकर यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात होणारे संशोधन उद्योगांनी जोपासलेल्या व्यावसायिकतेत समन्वय घडवून महाराष्ट्र राज्याच्या उद्योगाला चालना कशी देता येईल, याबाबतही डॉ. गायकर यांनी मार्गदर्शन केले. मलकानी आणि डॉ. माते यांनी विद्यापीठ इंडस्ट्रीज यांच्या समन्वयाने उद्योग कसा उभारला जाऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले.