आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरे अात्महत्या प्रकरणर : सीअायडीची तपासचक्रे गतिमान, आवाज दाबण्यासाठी त्रास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; निलंबित पाेलिस निरीक्षक अशाेक सादरे अात्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी नाशिक येथील गुन्हे अन्वेषण (सीअायडी) विभागाची दाेन पथके जळगावात दाखल झाली अाहेत. त्यांनी दिवसभर अप्पर पाेलिस अधीक्षक अाणि रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची सखाेल चाैकशी केली. तसेच सादरे राहत असलेल्या घराची पाहणी शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बरीच माहिती जाणून घेतली. यासह रामानंदनगर पाेलिस ठाण्यातील हत्यार दारूगाेळा नाेंदी रजिस्टरही या पथकांनी ताब्यात घेतले अाहे.

सादरे अात्महत्येप्रकरणी चाैकशीसाठी शुक्रवारी शहरात नाशिक येथून सीअायडीचे पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडेंसह चार अधिकारी, कर्मचारी तपासाधिकारी पाेलिस उपअधीक्षक के.डी.पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले अाहे. ही पथके तीन दिवस शहरात मुक्कामी अाहेत. त्यांच्यासाठी अजिंठा विश्रामगृहातील ‘गीत’ अाणि ‘दाेहा’ हे दाेन सूट अारक्षित करण्यात अाले अाहेत.

घराची पाहणी करून चौकशी
दाेन्हीपथके दुपारी १२ वाजता शहरात दाखल झाली. त्यांची रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अजिंठा विश्रामगृहात वाट बघत बसले हाेते. मात्र, त्यांनी थेट रामानंदनगर पाेलिस ठाणे गाठले. या वेळी त्यांनी पाेलिस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या काेल्हेनगरातील सादरेंच्या घराची पाहणी केली. तसेच शेजारी राहणारे विद्यार्थी नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत पथकाने रामानंदनगर पाेलिसांची चाैकशी केली. सादरेंनी ज्या डंपरवर कारवाई केली हाेती, त्यासंदर्भात पथकाने अारटीअाे कार्यालयातून वाहन काेणाचे अाहे? याविषयी माहिती घेतली.
मालपुरे‘एसपीं’ना भेटले : शिवसेनेचेगजानन मालपुरे यांनी दुपारी ३.३० वाजता पाेलिस अधीक्षक देशपांडे यांची भेट घेतली. त्यात त्यांनी सादरे प्रकरणाचा गाेपनीय अहवाल फाेडणाऱ्यांवर काय कारवाई करणार? त्यांची चाैकशी करणार काय? याविषयी विचारणा केली. मात्र, त्यांच्याशी संबंध नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. त्यानंतर मालपुरे यांनी याप्रकरणी नंदकुमार ठाकूर यांच्याकडे फीर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अाहे.

सीअायडीने रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप पाटील यांची दुपारी १.५० ते २.३५ वाजेपर्यंत अजिंठा विश्रामगृहातील ‘राजर्षी’ या व्हीअायपी सूटमध्ये चाैकशी केली. त्यात त्यांनी सादरेंच्या काम करण्याच्या पद्धतीपासून ते त्यांचे काेणाशी कसे संबंध हाेते, त्यांचा स्वभाव कसा हाेता याबाबत माहिती जाणून घेतली. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिघांचीही चाैकशी केली. त्यानंतर पथकांतील अधिकाऱ्यांनी सीअायडी कार्यालयालकडे माेर्चा वळवला. त्या ठिकाणी पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अप्पर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची दुपारी ३.५० वाजेपासून ते ४.५० वाजेपर्यंत चाैकशी केली. ठाकूर हे सादरेंवर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचे तपासाधिकारी हाेते. या प्रकरणात त्यांनी काय चाैकशी केली, त्यात त्यांना काय त‌‌थ्य अाढळले, चाैकशीचा अहवाल काय दिला यासंदर्भात माहिती जाणून घेतली.

पथकांतील अधिकाऱ्यांनी सादरेंचे सर्व्हिस रेकाॅर्ड, रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या स्टेशन डायऱ्या, लाॅगशीट अात्महत्येच्या अनुषंगाने विभागीय चाैकशीची जी कागदपत्रे अावश्यक हाेती ती सर्व तपासली. तसेच दारूगाेळा नाेंदी रजिस्टरसह तपासासाठी अावश्यक असलेली विविध कागदपत्रे ताब्यात घेतली.

पुढील स्‍लाइडवर वाचा सुटीच्यािदवशी हत्यार जमा करतात काय?