आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरे अात्महत्या प्रकरण: सीआयडी आज वरिष्ठांना अहवाल सादर करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नाशिक - पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणी सीआयडी पथकाचा तपास अहवाल पूर्ण झाला आहे. तो बुधवारी पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तपासाची खरी दिशा ठरवली जाणार आहे.

सादरे आत्महत्या प्रकरणात नाशिक येथील पोलिसांकडून तब्बल साडेतीन हजार पानांचा तपास अहवाल सीआयडी पथकाकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला होता. या कागदपत्रांच्या आधारे सीआयडीने तपासाचा विशेष अहवाल तयार केला आहे. तो बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलिस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षकांना सादर केला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर तपासाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
आत्महत्या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह वाळू व्यावसायिक सागर चौधरीवर गुन्हा दाखल असल्याने सीआयडी पथकाकडून नियोजनबद्ध आणि सूक्ष्म तपास केला जात असल्याने या तपासात वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

सादरे कुटुंबीयांना सीआयडीवर विश्वास
सादरेकुटुंबीयांना सीआयडी तपासावर पूर्ण विश्वास आहे. सीआयडीने आतापर्यंत उचललेल्या प्रत्येक पावलावर ते समाधानी आहेत. त्यामुळे सादरे यांना न्याय मिळण्याची पूर्णपणे अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. बुधवारी तपासाची दिशा काय ठरते, याकडेही त्यांचे लक्ष लागून आहे.
बातम्या आणखी आहेत...