आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadare Suicide Case: Investigation On Right Direction, Action Plan Ready

सादरे अात्महत्या प्रकरण: तपासाची दिशा निश्चित; अॅक्शन प्लॅनला महानिरीक्षकांची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नाशिक - पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्याप्रकरणी बुधवारी नाशिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात पोलिस महानिरीक्षकांना सुमारे साडेतीन हजार पानांचा अहवाल सादर केला. तो तपासल्यानंतर तपासाची पुढील रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच अॅक्शन प्लॅनलादेखील महानिरीक्षकांनी मंजुरी दिली.

सादरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून तब्बल साडेतीन हजार पानांचा तपास अहवाल सीआयडीला प्राप्त झाला होता. या कागदपत्रांच्या आधारे सीआयडी पथकाने तपासाचा विशेष अहवाल (आराखडा) तयार केला आहे. तो अहवाल सीआयडीने बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे पोलिस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षकांना सादर केला. या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात आली. यात तपास कसा आणि कुठल्या मुद्यांवर करायचा याबाबत महानिरीक्षकांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अॅक्शन प्लॅनला मंजुरी दिली. सादरे प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक के.डी.पाटील करीत आहेत.