आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर चौधरी, मिश्रांकडून मुख्यमंत्री निधीस ५१ हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमं‌त्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द करताना राजेश मिश्रा.
जळगाव - आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या वाढदिवसानिमित्त सागर चौधरी आणि राजेश मिश्रा यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कार्यकर्त्यांनी वाढदिवसावर खर्च करता दुष्काळग्रस्तांसाठी निधी द्यावा, असे आवाहन जगवानी यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चौधरी आणि मिश्रा यांनी हा निधी जगवानी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडे धनादेशाच्या स्वरूपात दिला. दरम्यान, निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्येप्रकरणी सागर चौधरी यांनी या खटल्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत नाशिक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जळगाव तालुक्याबाहेर जाऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.
चौधरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना ही अट घालण्यात आली आहे. मात्र, सोमवारी ‘दिव्य मराठी’च्या वृत्तात सागर चौधरी यांना जळगाव तालुक्यात येण्यास बंदी, असे मिळालेल्या अपूर्ण माहितीच्या आधारे प्रसिद्ध झाले आहे. जळगाव तालुक्यात येण्यास सागर चौधरी यांना कोणतीही बंदी नाही आणि त्यांना तडीपारही केलेले नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ नये म्हणून त्यांना कुणीही अडवलेले नाही, असा दावा करत चौधरी यांनी सांगितले की, याउलट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपण आणि राजेश मिश्रा यांनी ५१ हजारांचा निधी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...