आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर पार्कवर हाणामारी : सुऱ्यांनी केला एकमेकांवर वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सागर पार्क मैदानावर तरुणांमध्ये हाणामारी सुरू असताना नागरिकांची झालेली गर्दी. - Divya Marathi
सागर पार्क मैदानावर तरुणांमध्ये हाणामारी सुरू असताना नागरिकांची झालेली गर्दी.
जळगाव - तरुणांच्यादाेन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सागर पार्कवर रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या वेळी तरूणांनी दगड खुर्च्यांची फेकाफेक तर काहीनी अाॅम्लेटच्या गाडीवरील दाेन सुरे उचलून वार केल्यामुळे नागरिकांची पळापळ झाली हाेती. या घटनेमुळे परिसरात तासभर तणावाचे वातावरण हाेते.
‘फ्रेंडशिप डे’मुळे रविवारी संध्याकाळी तरूणाची प्रचंड गर्दी हाेती. सायंकाळी ६.३० वाजता प्रभू सुनील साेनवणे (वय १७, रा.बाबुराव साेसायटी, अादर्शनगर) हा त्याच्या मित्रांसाेबत मैदानावर बसलेला हाेता. त्यांच्या बाजूला बसलेल्या नावेद शेख, जुबेर मुर्गी, शारीक मलिक, जावा, जुनेद (पूर्ण नाव माहित नाही) अाणि इतर चार जणांसह प्रभूचा वाद झाला. या वेळी शिवीगाळ केल्यानंतर प्रभू सागर पार्क येथून निघून गेला काही वेळानंतर परत अाला. त्या वेळी प्रभूसह राजेश साळुंके (रा.समतानगर) दीपक (पूर्ण नाव माहित नाही) यांना काही तरुणांनी मारहाण करत दगडफेक केली. तर काही तरुणांनी विलास सुरेश फुसे (बारी) याच्या अाॅम्लेटच्या गाडीवरील दाेन सुरे घेऊन एेकमेकावर वार केले. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. घटनास्थ‌ळी पाेलिस पाेहाेचल्यानंतर हाणामारी करणाऱ्यांनी पळ काढला.

रेसरबाइकवर कारवाई : शहरातवाढलेल्या साेनसाखळीचाेऱ्या इतर गुन्ह्यांमध्ये हाेत असलेल्या रेसर बाइकच्या उपयाेगामुळे साेमवारपासून यावर कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी सांगितले.
पोलिसानी जप्त केलेल्या दुचाकी.

चार दुचाकी ताब्यात
रामानंदनगरपाेलिसांनी सागर मैदानावरून विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची हाेंडा अॅक्टिव्हा, यामाहाची डेल्टा (तिच्या मागच्या नंबरप्लेटवर ‘बावा’ असे इंग्रजीतून लिहिलेले), बजाज पल्सर (एमएच-१९-बीटी-३३५) हाेंडाची सीबीअार-२५० (एमएच-१८-एक्यू-३०००) या चार दुचाकी ताब्यात घेतल्या. या वेळी वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे, एलसीबीचे सहायक पाेलिस निरीक्षक दीपक लगड उपस्थित हाेते. तसेच घटनास्थळावरून राजेश साळुंके यालाही पाेिलसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.
बातम्या आणखी आहेत...