आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल शहरामध्ये दीड लाखांचे सागवान जप्त; फर्निचर दुकानदारांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ/यावल- यावल शहरात मंगळवारी वन विभाग (पूर्व आणि पश्चिम), गस्ती पथकाने संयुक्त कारवाई करत आठ फर्निचर दुकानांवर छापा टाकला. या छाप्यात सागवानी लाकडाचे 207 नग, सागवान चौकट असा एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईसाठी वनविभागाने आठ स्वतंत्र पथके तयार करण्यात केली होती. तपासणीदरम्यान शेख इरफान शेख युसूफ, निहाल हमीद, शेख रफिक शेख युनूस, शेख जाफर, फारूख शेख मुन्सी व असलम शेख अजगर या सहा दुकानदारांकडे सागवानचा अवैध साठा आढळला. त्यांच्यावर वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईत यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल डी.एस.पवार यांच्यासह तिन्ही विभागाच्या वन कर्मचार्‍यांचा सहभाग होता. दरम्यान, अचानक झालेल्या या कारवाईमुळे सागवान तस्करी आणि त्याचा काळाबाजार पुन्हा चर्चेत आला आहे.

तस्करांच्या हालचाली वाढल्या
सातपुड्यातील वनतस्करांच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. जंगलातून आणलेल्या सागवान लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्यांची प्रचंड भावाने विक्री केली जाते. या मुळे वृक्षतोड रोखण्यासह वनविभागाने चोरीचे सागवान खरेदी व त्यापासून तयार वस्तूंची विक्री करणार्‍यांवरही दुहेरी फास आवळायला सुरूवात केली आहे.