आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूख पटेल खून प्रकरणातील चाै‌था साक्षीदारदेखील फितूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाहरूख पटेल खून खटल्यात मंगळवारी चाैथा साक्षीदार निरंजन भालचंद्र चाैधरी याची साक्ष हाेती. मात्र, ताे फितूर झाल्याने त्याचा जबाब हाेऊ शकला नाही. या प्रकरणातील यापूर्वी तिन्ही साक्षीदार फितूर झाले अाहेत. शाहरूख खून खटल्याची न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू अाहे. खटल्यातील चाैथा साक्षीदार निरंजन चाैधरी याचा मंगळवारी जबाब हाेणार हाेता. यात त्याने जानेवारी २०१४ ला या प्रकरणातील अाराेपी राहुल जाेशी याला त्याच्या मालकीची माेटारसायकल दिल्याचा जबाब पाेलिसांकडे अाणि न्यायाधीशांसमाेर दिला हाेता. मात्र मंगळवारी न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमाेर ताे फितूर झाला. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. गाेपाळ जळमकर यांनी तर अाराेपीतर्फे अॅड. पंकज अत्रे यांनी काम पाहिले.