आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahitya Awarde Declared To Poetess Sania,bhalerao,avachat

कवयित्री सानिया, भालेराव, अवचट यांना साहित्य पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - यंदाच्या कवयित्री बहिणाबाई, बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे आणि ना.धों. महानोर साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून अनुक्रमे कवयित्री सानिया, इंद्रजित भालेराव आणि अनिल अवचट यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

भवरलाल अ‍ॅँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन आणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात येतात. बहिणाबाई आणि बालकवींच्या नावे सन 2003 पासून तर ना.धों. महानोरांच्या नावे सन 2011 पासून पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष भालचंद्र नेमाडे यांनी सोमवारी केली. 51 हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 6 सप्टेंबर योजी जळगाव येथील जैन हिल्स येथे असलेल्या गांधीतीर्थ सभागृहात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
निवड समितीत मधू मंगेश कर्णिक, गो.मा.पवार, रवींद्र इंगळे चावरेकर, सुलभा भानगावकर, ना.धों. महानोर आणि विश्वस्त ज्योती जैन यांचा समावेश होता.