जळगाव- श्रीराम मंदिर संस्थान संचलित संत मुक्ताबाई राम पालखीचे प्रस्थान र्शीक्षेत्र पंढरपूरकडे गुरुवारी सकाळी 8.30 वाजता झाले. या वेळी वारकरी व भक्तांनी संत ज्ञानश्वरांसह तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर केला.
पीपल्स बॅँकेचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी वसंतराव जोशी, शिवाजी भोईटे, दुर्गादास नेवे आदी उपस्थित होते. बाळासाहेब राणे गुरुजी यांनी पायी वारी-पालखी सोहळ्यासंदर्भात वारकर्यांना मार्गदर्शन केले. या पालखीची स्थापना सद्गुरू आप्पा महाराजांनी शके 1794मध्ये केली आहे. पालखीसोबत वारकरी मंडळींच्या आरोग्यसेवेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथक आहे. या पालखीचे नेतृत्व आप्पा महाराजांचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज करीत आहेत. या वेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे सुनील भंगाळे यांनी पायी वारीदरम्यान वारकर्यांकरिता लागणार्या औषधांची पाकिटे दिली. प्रस्थान मार्गावर र्शीराम रांगोळी समूहाच्या कलाकारांनी व राजू भावसार यांनी ठिकठिकाणी सुबक रांगोळ्या साकारल्या होत्या. मुकुंद धर्माधिकारी व नंदू शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले. तसेच कवी कासार, देवेश पाठक, गजानन फडे, सुनील तांबट, बाबा ठाकूर, केशव भंडारी, योगेश्वर जोशी, विशाल सोनार आदींनी सहकार्य केले.
पालखी मिरवणूक
11 जून रोजी र्शीराम मंदिर येथे भजन होऊन मंगेश महाराज यांच्या हस्ते संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचा अभिषेक व पादुकापूजन झाले. पालखी मिरवणुकीस बुधवारी संध्याकाळी 5 वाजता प्रारंभ झाला. भोईटे गढी, कोल्हेवाडा, तेली चौक, सद्गुरू बाबाजी महाराज समाधी मंदिर, गोपाळपुरा, विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंतनगरमार्गे संत आप्पा महाराज समाधी मंदिरात पालखीचे आगमन झाले. या वेळी पंचपदी व आरती होऊन भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. या वेळी रवी सपके व संजय कुळकर्णी यांच्यातर्फे वारकर्यांसाठी भोजनव्यवस्था करण्यात आली होती.