आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील विविध शाळांमध्ये संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्यानगरातील महात्मा फुले बहुद्देशीय समाज विकास संस्थेतर्फे कासार सेवा संघात पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिक रामचंद्र थोरात, महिपत इंगळे, भगवान पाटील, वसंत महाजन, संस्थाध्यक्ष नंदू पाटील, प्रशांत महाजन, सचिव सुभाष माळी, संतोष इंगळे यांनी प्रतिमा पूजन केले. नंदू पाटील यांनी संत सावता महाराज यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. वामन महाजन, हेमंत माळी, सुनीता महाजन, हिरा पाटील, कल्पना माळी, सविता माळी, प्रमोद थोरात, दिलीप बागुल यांनी नियोजन केले.

आसोदा येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन
आसोदा (ता.जळगाव) येथे माळीवाड्यातील मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी प्रतिमेचे पूजन केले. टाळमृदुंगाच्या गजरात वाणीगल्ली, मढीपेठ, राम मंदिर, महादेव मंदिरमार्गे सावता मंदिरावर समारोप झाला. या वेळी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अरुण माळी, विजय भोळे, शांताराम माळी , बारसू माळी, रामचंद्र माळी आदी उपस्थित होते.

शनिपेठेत पंचमंडळातर्फे प्रतिमेची मिरवणूक
शनिपेठेतील समस्त फुलमाळी पंचमंडळातर्फे संत सावता माळी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शनि मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. रथ चौक, पांजरपोळ, सुभाष चौक, घाणेकर चौकमार्गे शनि मंदिराजवळ समारोप झाला. अध्यक्ष आत्माराम माळी यांनी प्रतिमेचे पूजन केले. बुधा माळी, हरी माळी, प्रकाश माळी, प्रभाकर जाधव, संजय वारुळे, शालिग्राम मालकर, मनोज भामरे, वसंत महाजन, नामदेव महाजन, मधू महाजन, दीपक भामरे यांनी नियोजन केले.

हरिविठ्ठलनगरात माळी समाजातर्फे प्रतिमा पूजन
हरिविठ्ठलनगरातील माळी समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे नगरसेविका पार्वता भिल यांनी प्रतिमा पूजन केले. या वेळी हरिनामाच्या गजरात परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात भजनी मंडळे सहभागी झाली होती. दुपारी महाप्रसादाचाही कार्यक्रम झाला, यानंतर चिंतामण महाराज आडगावकर यांचे कीर्तन झाले. मंडळाचे अध्यक्ष ईश्वर महाजन, अरुण महाजन, टी.एस.महाजन, मोहन महाजन, देविदास महाजन, राजू इंगळे, परशुराम महाजन, देविदास महाजन, शांताराम महाजन, पितांबर बारी, लक्ष्मण महाजन यांनी नियोजन केले.