आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेट प्रकरण : ‘सेंट टेरेसा’वर कारवाई!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विद्यार्थ्यांना एक्सपायरी डेट पार केलेल्या (मुदत संपलेल्या) गोळ्यांचे वाटप केल्याप्रकरणी सेंट टेरेसा शाळेवर कारवाई करणार असल्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी शुक्रवारी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

स्वातंत्र्यदिनी सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजवंदनानंतर ‘पारले मँगो बाईट’ या गोळ्या वाटण्यात आल्या. या गोळयांचे पॅकिंग 4/11 (एप्रिल 2011) मध्ये झाले असून त्यावर ‘बेस्ट बिफोर 12 मंथ फ्रॉम पॅकिंग’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता त्यांना शाळा प्रशासनाकडून दाद देण्यात आली नाही. तर पालकांनाही धमकावण्यात आले. शाळा प्रशासनाने या संदर्भात चूक मान्य केली आहे. उपप्राचार्या सिस्टर नॉयल यांनी हा प्रकार चुकून झाला असल्याचे सांगितले होते. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता या प्रकारास कारणीभूत असलेल्या शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे अनेक पालकांनी ‘दिव्य मराठी’चे आभार मानले आहेत.
शाळा प्रशासनाने चूक मान्य केली असल्यास त्यांनी या प्रकारास जबाबदार शिक्षक किंवा कर्मचार्‍यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा शाळेला या संदर्भातील खुलासा सादर करण्यासाठी पत्र देण्यात येईल. तसेच याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी