आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावखेड्याच्या वदि्यार्थ्यांकडे असतील टॅब!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यात वदि्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची चर्चा सुरू असताना जळगाव तालुक्यातील शाळेने त्याची प्रत्यक्ष अंमलबाजावणी सुरू केली आहे. शाळेतील सर्व वदि्यार्थ्यांना हायटेक करणारी ही शाळा खासगी किंवा आंतरराष्ट्रीय नाही; तर जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावकऱ्यांच्या पुढाकाराने शाळेतील सर्व वदि्यार्थ्यांना आठवडाभरात टॅब देऊन त्यांच्या दप्तराच्या ओझ्यापासून मुक्ती करणार आहेत. जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग आहेत. दोन शिक्षक असणाऱ्या या शाळेत ५६ वदि्यार्थी आहेत. शाळेला जानेवारी २०१५ राजी आयएसओ नामांकनही प्राप्त झाले आहे. आता शाळेने सर्व ५६ वदि्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणांची मदत महत्त्वाची यागावातील उच्चशिक्षित युवक-युवती शाळेला मदत करतात. मुलांनी टॅब खरेदीसाठी आर्थिक मदत दिली. तसेच सोबत दररोज एक तास शाळेत येऊन मुलांना शिकवण्याचेही काम ते करतात.

दप्तरही केले बंद
अरुणचौधरी प्रवीण चौधरी या दोघाही शिक्षकांनी यावर्षी शाळा सुरू होताच गेल्या वर्षाची मुलांची पुस्तके जमा करून घेतली. ती पुस्तके त्या वर्गात नव्याने आलेल्या मुलांना दिली. तसेच शासनाकडून नवीन पुस्तके मिळाली. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे दोन संच झालेत. आता मुले एक संच घरी तर दुसरा शाळेत ठेवतात. परिणामी, दप्तर ओझे कमी झाले.

असे झाले प्रयत्न
शाळेला आयएसओ मिळाल्यावर मुलांना टॅब देण्याचा विचार सुरू झाला. सरपंच एम.के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अरुण चौधरी शिक्षक प्रवीण चौधरी यांनी चाचपणी केली. कष्टकरी मुलांच्या एका ग्रुपने तीन टॅब देण्याचे जाहीर केले. पाहता पाहता सारं गाव झपाटून उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमात सावखेडा गावातील प्रत्येक माणसाने सहभाग घेतला.

सर्व गावकरी शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी झाला आहे. येणाऱ्या काळात शाळेत अजून सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. -एम.के.पाटील, सरपंच, सावखेडा खुर्द, ता.जळगाव