आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार मिळेपर्यंत सुरूच राहणार पालिका कर्मचा-यांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पगार आणि पेन्शनच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला असला तरी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांचे स्पष्ट केले आहे. आंदोलनात सहभागी झालेले लिपिक मनोज गोयर यांच्या छातीत कळ येऊन ते कोसळले. सोमवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सगळ्याच विभागातील कामकाज ठप्प होते. मंडपाजवळ बसलेले असताना मनोज गोयर या कर्मचा-यांच्‍या छातीत कळ येऊन ते कोसळले. त्यानंतर सहकर्मचा-यांनी त्यांना तातडीने डॉ. मिलिंद वायकोळे यांच्याकडे हलवले. तेथे तपासणी केली असता त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. दोन महिन्यांपासून मुलांच्या शाळेची फी, तसेच इतर खर्चासाठी पैसे नसल्याने आपली दुचाकी विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.