आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sale Of Counterfeit Gold Issue At Jalgaon, Divya Marathi

सुवर्णनगरीत बनावट सोने विक्रीचा प्रयत्न फसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बनावट सोने विक्रीच्या प्रयन्‍त असलेल्या गणेश भीमसिंग सोलकी (रा. कळमणा मार्केट, नागपूर) यास शशिकांत तळेले यांच्या सावधानतेमुळे रामानंदनगर पोलिसांनी बुधवारी सकाळी 11.30 वाजता पिंप्राळा परिसरातून अटक केली. तो तीन दिवसांपासून नागरिकांना एक किलो सोने कमी भावात विक्री करावयाचे असल्याचे सांगत होता. त्यांच्याकडून 4 हजार 640 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सोने पाहून आला संशय
गणेश हा तळेले यांना भेटल्यानंतर त्याने स्वत:कडील निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवलेले पिवळ्या धातूचे मणी आणि माळा दाखवल्या. एक लाख रुपयात एक किलो सोने देतो, असे गणेश सोलकीने सांगितले; परंतु सोने पाहिल्यानंतर तळेलेंना ते बनावट असल्याचा संशय आला; पण त्यांनी गणेशला या विषयी जराही संशय येऊ न देता गप्पांमध्ये रमवले.

30 हजारांत एक किलो सोने
गप्पा करताना तळेले यांनी गणेशला आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्या वेळी गणेश म्हणाला की, मला हे सोने गावाकडे खोदकामात सापडले असून तुम्ही एक किलो सोन्याचे 30 हजार रुपये जरी दिले तरी चालेल, असे सांगितले. त्यानंतर तो शशिकांत तळेले यांना सारखा आग्रह करू लागला.

अशी केली ठगास रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने अटक
गणेश ऐकत नसल्याने शेवटी त्याला थांबण्यास सांगून तळेले यांनी गुपचूप रामानंदनगर पोलिस ठाण्यात फोन करून या चोराविषयी कल्पना दिली. त्यानंतर काही वेळातच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी नीलेश सूर्यवंशी, किरण पाटील, जीवन पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गणेश सोलकीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 650 रुपयांच्या सोन्याचा पॉलिश केलेला पितळी माळांचा गुच्छ, 2 हजार 590 रुपयांचे सोन्याचे चार मणी आणि 1400 रुपयांचे चांदीचे दोन नाणी असा एकूण 4 हजार 640 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.