आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीपेठेत चक्क बनावट मोबाइल विक्री, बालाजी मोबाइलवर एलसीबी पथकाचा छापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ग्रेमार्केटचा माल असल्याचे भासवून बनावट मोबाइल्स विकणाऱ्या नवीपेठेतील बालाजी मोबाइल या दुकानातून शुक्रवारी कार्बन कंपनीचे अडीच लाखांचे १९५ मोबाइल जप्त करण्यात अाले. कार्बन कंपनीच्या प्रोटेक्ट आयटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली.

नवीपेठेतील मनपा शिक्षण मंडळाजवळ वासुकमल लॅण्डमार्क इमारतीच्या तळमजल्यात दीपक भजनलाल पुरसनानी (रा.सिंधी काॅलनी) याचे विविध कंपन्यांचे होलसेल मोबाइल्स विक्रीचे ‘बालाजी मोबाइल’ नावाने दुकान आहे. या ठिकाणी कार्बन कंपनीच्या बनावट मोबाइल्सची विक्री होत असल्याची माहिती प्रोटेक्ट आयटी कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुरेश दुधाने यांना जळगाव शहरातून मिळाली हाेती. त्यानंतर गुरुवारी दुधाने यांनी बालाजी मोबाइलमधून कार्बनचे पाच मोबाइल सात हजार रुपये किमतीत खरेदी केले. याबाबतचे बिलही त्यांनी पुरसनानी यांच्याकडून घेतले. त्यानंतर दुधाने यांनी मोबाइल्स तपासले असता, ते बनावट आढळून आले. त्यामुळे त्यांनी याविषयी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती िदली. त्यानुसार त्यांनी संयुक्तपणे दुपारी वाजता बालाजी मोबाइलवर धाड टाकली. पथकाने सुरुवातीला दुकानाचा परवाना, मोबाइल अाणि विक्रीची बिले यांची तीन तास तपासणी केली. तसेच दुधाने यांनी दुकानातील नोकरांना कार्बन कंपनीच्या माेबाइलचे २० खोके बाजूला काढायला लावले. त्यात के-१०५ एस मॉडेलच्या ९९० रुपयांपासून ते के-१८ जम्बो या २७ हजार ८०० रुपयांच्या मोबाइलचाही समावेश हाेता. त्यांची तपासणी करून पथकाने लाख ४० हजार ६५० रुपये किमतीचे १९५ बनावट मोबाइल जप्त केले. बनावट मोबाइल कोठून खरेदी केले? याबाबत पुरसनानी याने पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पथकाने दीपक पुरसनानी याला ताब्यात घेण्यात अाले असून, शहर पोलिस ठाण्यात फसवणूक ट्रेडमार्क अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावटमोबाइल विक्रीचे मार्केट
गोलाणीमार्केटमध्ये इतरही कंपन्यांच्या बनावट मोबाइल विक्री होत असल्याचा संशय दुधाने यांनी व्यक्त केला आहे. याबाबत चौकशीची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
मोबाइलच्या वेष्टणावर थ्री-डी मोनोग्राम बघावा. तसेच कंपनीच्या इम्पोर्टरचे नाव, वेष्टणावर कंपनीचे सील, आयएमईआय नंबर, मेड इन इंडिया हे लिहिलेले बघावे. त्याचप्रमाणे मोबाइलच्या वेष्टणावर देण्यात आलेले फीचर्स काळजीपूर्वक बघावे.

मोबाइल घेताना ही काळजी घ्यावी
ग्रे मार्केटचा माल भासवून विक्री
पुरसनानीयाने विदेशातून कस्टम ड्यूटी चुकवून आणलेले ग्रे मार्केटचे मोबाइल असल्याचे भासवून किरकोळ मोबाइल विक्रेत्यांना होलसेल भावात कार्बन कंपनीच्या बनावट मोबाइलची विक्री करत होता. व्हॉट्सअॅपवर ग्रे असे लिहून मायक्रोमॅक्स कार्बन या कंपन्यांचे दर मोबाइल विक्रेत्यांना पाठवत होता. मात्र, कंपनीच्या मूळ खरेदी किमतीपेक्षा त्याच्या दुकानातील बनावट मोबाइलची किंमत जास्त असल्याचे तपासणीत आढळले.

बनावट मोबाइल्समध्ये हे आढळले
कार्बनकंपनीच्या बनावट मोबाइल्सच्या वेष्टणावर १.३ मेगा पिक्सल कॅमेरा, मोबाइलमध्ये टॉवरचे चित्र, स्क्रीनवर कार्बन जम्बो के-९ असे नाव, इम्पोर्टरचे नाव चुकीचे पाठीमागे सील लावलेले आढळून आले नाही. तसेच मोनोग्रामही गायब हाेता. दोन्ही सिमचे आयएमईआय नंबर बनावट ‘मॅन्युफॅक्चर्ड बाय चायना’ असे लिहिलेले आढळून आले.
बालाजी मोबाइल दुकानात तपासणी करताना प्रोटेक्ट आयटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक एलसीबीचे पथक.
बातम्या आणखी आहेत...