Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Sales of Pesticides decreased by 90%

विदर्भातील घटनांचा परिणाम: पेस्टीसाइडची विक्री 90% घटली

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 09:47 AM IST

विदर्भात विषारी अाैषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे काही कीटकनाशकांवर बंदी अाली अाहे. मात्र, यामुळे कीट

 • Sales of Pesticides decreased by 90%
  जळगाव- विदर्भात विषारी अाैषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे काही कीटकनाशकांवर बंदी अाली अाहे. मात्र, यामुळे कीटकनाशकांसाेबत पेस्टीसाइडच्या विक्रीवर जवळपास ९० टक्के परिणाम झाला अाहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकासाेबत पिकांना वाढीसाठी अावश्यक अन्नघटक पुरवणाऱ्या अाैषधीची खरेदी थांबवली अाहे. त्यामुळे एेन विक्रीच्या हंगामात व्यवसाय ठप्प झाल्याने विक्रेते अडचणीत अाले अाहेत.

  विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा हाेऊन अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने कीटकनाशकांच्या विक्रीवर निर्बंध अाणले अाहेत. अाज बाजारपेठेत शेकडाे कंपन्यांचे अडीचशे ते तिनशे प्रकारचे पेस्टीसाईड विक्रीसाठी उपलब्ध अाहेत. जिल्ह्यात एकेका डिलर्सची एका हंगामात एक ते दीड काेटींची उलाढाल हाेते. तर जिल्ह्यातील पेस्टीसाईडच्या बाजारपेठेची उलाढाल २० ते २५ काेटी रुपयांची अाहे. मात्र, ती अवघ्या काही लाखांवर येऊन पाेहचली अाहे. शेतकऱ्यांनी देखील अशा जीवघेण्या पेस्टीसाईडचा वापर टाळण्याची मनाेभूमिका केली अाहे. त्यामुळे शेतकरी खत-बियाण्यांच्या दुकानाकडे फिरकेनासे झाल्याने बाजारपेठ ठप्प झाली अाहे. त्यामुळे दुकानदार चिंतेत पडले अाहेत. दरम्यान, काही लहान विक्रेत्यांनी अापला माल मुख्य वितरकाकडे परत पाठवण्यास सुरुवात केली अाहे.

  सकाळीच करा फवारणी
  शेतकऱ्यांनीकीटकनाशकाचा रिकाम्या बाटल्या उघड्यावर टाकू नयेत. ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने दुपारी तर सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढत असल्याने सायंकाळी फवारणी करता ती सकाळच्या वेळीच करण्याचे आवाहन केले.

  अधिक माल परत नाही
  अद्याप लहान विक्रेत्यांकडून फार अधिक प्रमाणावर माल परत येत नाही. काही उत्पादनाबाबत प्रयाेगशाळांचे अहवाल अाल्यानंतर ती उत्पादन कंपनीकडे पाठवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. हर्षलपाटील, क्रांती ट्रेडर्स

  फवारणी करताना जणांचा 4 मृत्यू; 161 जणांना विषबाधा
  एप्रिलपासून जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना १६१ जणांना विषबाधा, तर व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली. फवारणीमुळे विषबाधा होवू नये, यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, कीटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी तसेच विक्रेते यांना दिल्या.

  या वेळी जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजीराव आमले, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, नारायण देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी, सीडस् असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ यांच्यासह कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी किट वापरावे. तसेच वाढत्या तापमानात विषबाधा होण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी दुपारच्या वेळेत करता शक्यतो सकाळीच करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखाची मदत
  जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या नऊ शेतकऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार लाख रूपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यात ईश्वर माणिक पाटील (रा.मंगरूळ, ता.पारोळा), देविदास प्रकाश पाटील (रा.विटनेर, ता.चोपडा), सागर विश्वास पाटील (रा.शहापूर, ता.अमळनेर), नारायण चंदू जाधव (रा.रोकडे, ता.चाळीसगाव), गुलाब नथा सोनवणे सुधीर वाल्मीक पाटील (रा.कळमडू, ता.चाळीसगाव), जितेंद्र नारायण जावळे (रा.भादली, ता.जळगाव), शिवाजी भास्कर पाटील (रा.शहापूर, ता.जामनेर), प्रेमराज राघो पाटील (रा.लोणी बु.,ता.पारोळा) या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळणार आहे.

Trending