आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश महाजनांच्या आरोग्य शिबिरास सलमानचे अडीच कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डझनभर मंत्री, ५० अामदार अाणि खासदारांचा ताफा जळगावात जानेवारीला दाखल हाेणार अाहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या माेफत महाअाराेग्य शिबिराच्या निमित्ताने हा ताफा येणार अाहे. दरम्यान, अभिनेता सलमान खान याने शिबिरासाठी अडीच काेटी रुपयांचे अर्थसहाय्य केले अाहे. यातून शिबिराचा खर्च भागवला जाणार अाहे.

महाअाराेग्य शिबिराच्या निमित्ताने राज्यभरातील नामांकीत तज्ज्ञ डाॅक्टरांचा चमूही येणार अाहे. जळगाव अाणि परिसरातील जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार रुग्ण या शिबिराचा लाभ घेणार अाहे. गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या शिबिराचे नियाेजन अभ्यासण्यासाठी काही खासदार अाणि अामदारदेखील येणार अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती, विधानसभा विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध १२ मंत्री शिबिराच्या उद‌्घाटनास उपस्थित राहणार अाहेत. या कार्यकम्रात जिल्ह्यासाठी अत्याधुनिक २० रुग्णवाहिका, शववाहिका यांचे लाेकार्पण करण्यात येणार अाहे.

या शिबिरात उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची पूर्व तपासणी आणि नोंदणी केली जात अाहे. बुधवारअखेर जिल्हाभरातून ३२ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात अाली अाहे. शिबिराचे स्थळ सागर पार्क ऐवजी खान्देश सेंट्रल मॉल येथे करण्यात अाले अाहे. बुधवारी गिरीश महाजन यांनी याठिकाणी पाहणी केली.

बुधवारी एका दिवसात जळगाव शहरामध्ये हजार ७५१ रुग्ण तर ग्रामीण भागात हजार रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात अाली. या शिबिरात जिल्हा रुग्णालय, डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अार्किड हाॅस्पिटल येथे माेफत शस्त्रक्रिया केली जाणार अाहे.

शिबिरासाठी पाचशे डाॅक्टर, सात पद्मश्री
शिबिरात४५० ते ५०० डाॅक्टरांचा ताफा सहभागी हाेईल. यात डाॅक्टर्स हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त अाहेत. या शिबिरात गरज भासल्यास अत्याधुनिक रुग्णवाहिकेमध्ये उपग्रहाद्वारे तज्ज्ञ डाॅक्टर मार्गदर्शन करतील. या रुग्णवाहिका जळगावसाठी लाेकार्पण करण्यात येणार अाहेत.

राज्यातील दुष्काळी भागात शिबिर घेणार
जळगावप्रमाणे आता राज्यातील दुष्काळग्रस्त भागातही असे महाअाराेग्य शिबिर घेण्यात येणार अाहे. जळगावात होणाऱ्या शिबिराच्या उद‌्घाटनप्रसंगी २० रुग्णवाहिका, शववाहिकांचे देखील लाेकार्पण केले जाणार अाहे.
- गिरीश महाजन, जल संपदामंत्री
बातम्या आणखी आहेत...