आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान दोषी, पण रवींद्रला न्याय मिळेल? साक्षीदार रवींद्र पाटीलच्या आईचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रवींद्र पाटील यांची अाई
धुळे - संस्कारांचं देणं म्हणून शेवटपर्यंत रवींद्र खरं बोलत होता. त्याची साक्ष आणि तक्रार सलमान खानला दोषी ठरवण्यात महत्त्वाची ठरली. जखमी व पीडितांना न्याय मिळाला, पण आमचे काय? रवींद्र गेल्यामुळे सर्वस्व गमावून बसलो. आम्हाला कुठे आणि कोण न्याय देणार ? असे प्रश्न उपस्थित केले रवींद्र पाटील याची आई सुशीला पाटील यांनी. अश्रूंना मोकळी वाट करून देत या मातेने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मूळचा धुळ्यातील रहिवासी असलेला रवींद्र पाटील याच्या घरी गेल्यावर त्याची आई सुशीला पाटील यांनी सलमानच्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. सलमानला जामीन झाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकर लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, खरे बाेलणे पाप आहे का ? पोलिस म्हणून शेवटपर्यंत त्याने साक्ष बदलली नाही, यात गैर ते काय? मग रवींद्रच्या माथी नको ते बालंट अाणि दबाव कशाला? हेच त्याच्या खंगून मृत्यूला कारणीभूत ठरले. त्याच्यारूपाने आमचे सर्वस्व गेले. केवळ या घटनेमुळे त्याच्या आयुष्याची झालेली वाताहत झाली.
पर्यायाने कुटुंबाची अपरिमित हानी झाली. रवींद्रच्या मृत्यूनंतरही कुटुंबाची होणारी उपेक्षा का कोणाला दिसत नाही? पाेलिस खात्यावरील विश्वास त्याने सार्थ ठरवला नाही का ? मग याकडे का डोळेझाक केली जाते? असे असेल तर उद्या कोणताच पोलिस अथवा नागरिक
खरे बोलण्यासाठी धजावणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर रवींद्रची पुतणी मानसी व पुतण्या प्रशांत यांनी त्या घटनेनंतरच काका (रवींद्र) सतत दबावाखाली वावरत होते. पहिल्याप्रमाणे त्यांचा आनंद लोप पावला होता; परंतु तत्त्वांशी त्यांनी तडजोड केली नाही. न्यायालयाचा आम्हाला आदर आहे; परंतु आमच्या काकांनाही न्याय मिळाला पाहिजे. एवढीच अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

रवींद्र उत्तम खेळाडू होता
रवींद्र हा फुटबॉल व कराटेचा उत्तम खेळाडू होता. सन १९९८मध्ये तो पोलिस सेवेत आला. प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. यादरम्यान त्याच्याकडे सलमानच्या अंगरक्षकाची जबाबदारी होती. िहट अँड रनच्या घटनेनंतर नाेकरीवर अनुपस्थित असल्याचा आरोप ठेवत त्याने नाेकरी गमावली, कोर्टात गैरहजर राहिल्याबद्दल त्याची जेलमध्ये रवानगी झाली. यानंतर शिवडी येथील रुग्णालयात क्षयरोग व तणावामुळे ३ ऑक्टोबर २००७ रोजी त्याचा मृत्यू झाला.

नाहक शिक्षा मिळाली
घटनेच्या दिवशी जे. डब्ल्यू. मिरॅएट हॉटेलमधून परतताना झालेल्या अपघाताच्या वेळी रवींद्र सलमानसोबत होता. अपघातानंतर त्यानेच वांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर एफआयआर दाखल केली होती. बस तेव्हापासूनच त्याच्या वाताहतीला सुरुवात झाली. त्याच्यावरील दबाव वाढत गेला, हिट अॅण्ड रनची घटना घडली नसती तर रवींद्र आमच्यात राहिला असता असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.