आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sand Carriers Beating Village Revenue Head, Attackers Run Away

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू वाहतूकदारांची तलाठ्याला मारहाण, हल्लेखोर पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- तालुक्यातीलपातोंडा येथे वाळूचे ट्रॅक्टर पकडले म्हणून तलाठ्यावर हल्ला करण्यात आला. दोन जण ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. सोमवारी दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली.
गिरणा तितूर नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक अद्यापही सुरु आहे. तलाठी अशोक उखा गायकवाड यांनी दुपारी वाळूचे ट्रॅक्टर पकडले. कर्मचा-यांसह ट्रॅक्टर चाळीसगाव पोिलस स्टेशनमध्ये आणत असतांना एम.एच. १९ बीवाय ७६७३ या मोटार सायकलवरून दोन जण आले. ट्रॅक्टर अडवून त्यांनी तलाठी गायकवाड यांना दमदाटी केली. आपले म्हणणे तहसीलदार पोलिस स्टेशनमध्ये येवून सांगा, असे आवाहन केल्यानंतरही दोघा अज्ञात तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर गायकवाड यांना मारहाण करण्यात आली. याप्रकाराने महसूलचे कर्मचारी अवाक झाले. आरोपी ट्रॅक्टर घेवून पसार झाले. पातोंडारोडवरील नाल्याजवळ ही घटना घडली. आरोपींिवरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हद्दपारीचीकारवाई
अमळनेरप्रांताधिका-यांनी तर अवैध वाळूू व्यवसायिकांना हद्दपारी सारख्या कारवाईच्या कक्षेत आणण्याचे जाहीर केले, तरी देखील अवैध वाळू वाहतूक थांबलेली नाही. स्थानिक राजकीय पाठबळामुळे अवैध वाळू व्यवसायिक मूजोर झाले आहेत.

२१ गावांचा विरोध
चाळीसगावपरिसरात वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली असून त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांची हिंमत वाढत आहे. चाळीसगाव तालुक्यातील २१ गावांनी ठराव पारीत करून वाळू वाहतुकीला विराेध केला असतांना अवैध वाहतूक मात्र सुरु आहे. वाघळी, पातोंडा येथे तितूर नदीपात्रातून सर्रासपणे वाळू वाहतूक होत आहे. केवळ दंड आकारता गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

यापूर्वीदेखीलहल्ले
चाळीसगावतालुक्यात तहसीलदारांचे वाहन जाळण्यापर्यंत वाळू वाहतूकदारांची मजल गेली होती. त्यानंतर मेहुणबारे येथील पोलिसालाही लक्ष केले होते. त्यानंतर दोन वेळेस तलाठ्यावर हल्ले झाले. बहाळ येथे मागील महिन्यात वाळू पकडणा-या युवकावर हल्ला झाला होता. वाघळी येथे वाळू वाहतुकीला विरोध करणा-या तरुणांवर दगडफेक झाली. हल्ले वाढल्याने अवैध वाळू वाहतूक रोखणे प्रशासनाला कठीण जात आहे.