आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sand Contractor Chaudhari 7 Hours Inquiry In Nashik

वाळू ठेकेदार चौधरीची नाशकात तास चौकशी, सादरे आत्महत्या प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नाशिक- निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत २० हजारांची रोकड लुटल्याचा आरोप करणारे वाळू ठेकेदार रवींद्र चौधरी यांची सोमवारी सीआयडीच्या कार्यालयात सहा ते सात तास कसून चौकशी करण्यात आली.
सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे तपासाधिकारी पोलिस उपअधीक्षक के.डी.पाटील यांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान, याप्रकरणी मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांच्यासह आणखी दोघांचीही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिस निरीक्षक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असल्याचे सांगत दुसऱ्याच दिवशी सीआयडीने जळगावमधील चौघे वाळू ठेकेदार रस्त्याची कामे घेणाऱ्या कंत्राटदारांना चौकशीसाठी समन्सबजावले. त्यापैकी एक ठेकेदार रवींद्र चौधरी यांची तब्बल सहा ते सात चौकशी करण्यात आली. सादरे आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले संशयित सागर चौधरी आणि रवींद्र चौधरी हे दोघे समव्यावसायिक असून, त्यांच्यात मैत्रीचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सादरेंविराेधात न्यायालयाच्या आदेशान्वये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून २० हजारांची रोकड खिशातून काढून घेतल्याचा जो गुन्हा दाखल आहे, त्यात फिर्यादी सागर चौधरी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही घटना रवींद्र चौधरींबाबत घडली होती. तरीही रवींद्र चौधरी यांच्याऐवजी सागर चौधरी यांनी ही तक्रार कुठल्या आधारावर दिली? याबाबतची सखोल चौकशी सीआयडीने केली. तपास पथकाकडून सुरुवातीला सादरेंवरील आरोपांची चौकशी केली जात आहे. त्यात चौधरींसोबत मुख्य ठेकेदार राजेंद्र मिश्रा नगरसेवक ललित कोल्हे यांच्याशी त्यांचा संबंध असून, त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

मिश्रांना आज, तर कोल्हेंना उद्या हजर राहण्याचे आदेश
मंगळवारीमिश्रा आणि बुधवारी कोल्हे यांना चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौघा ठेकेदारांच्या जबाबानंतर सीआयडी पथक जळगावमध्ये दाखल होऊन चौकशीला गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.