आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांमुळे तलाठी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अवैध वाळूचे उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या कढोली-रिंगणगाव येथील तलाठी ए.पी.सुरवाडे हे वाळूच्या ट्रॅॅक्टरवरून खाली पडल्यामुळे जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी 8.45 वाजता वैजनाथ परिसरातील गिरणा नदीपात्रात घडली. या घटनेमुळे वाळू तस्करांचा उच्छाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुरवाडे आणि नागदुलीचे तलाठी घनश्याम पाटील हे दुचाकीने (एमएच-19, बी-798) वैजनाथ परिसरात गस्त घालत होते. गिरणा पात्रात वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी मोहाडीमार्गे गिरणापात्र गाठले. पात्रात सहा ट्रॅक्टर होते; पैकी पाटील यांनी एक तर सुरवाडे यांनीही एक ट्रॅक्टर थांबवले. ट्रॅक्टरचालकाचा मोबाइल आणि चावी सुरवाडेंनी ताब्यात घेतली. याचवेळी दुसर्‍या एका ट्रॅक्टर चालकाने पळून जाण्याचा प्रय} केला. सुरवाडे ट्रॅक्टरला थांबवण्यासाठी ट्रॅक्टरवर चढले. चालकाने लगेच ट्रॅक्टर सुरू केले, त्यामुळे सुरवाडे खाली कोसळले. यात ते जखमी झाले. त्यांच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांना इजा झाली असून डावा हात फ्रॅर झाला. सुरवाडे सध्या डॉ. प्रताप जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

पोलिस, महसूल यंत्रणा सुस्त
गिरणा नदीपात्रासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाळू उत्खनन बंद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळूमाफियांनी एक दिवसही बंद पाळलेला नाही. गिरणापात्रात झालेल्या उत्खननामुळे नदीत कपारे तयार होऊन पोहायला जाणार्‍या मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गणेशोत्सवात पिंप्राळा परिसरातील दोन वर्षीय बालकाचा वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. असे असताना अजूनही वाळूचे उत्खनन रोखण्यात पोलिस आणि महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. गिरणापात्रातील दोन ते तीन किलोमीटर भागातून सातत्याने वाळू उपसली जात आहे. एवढय़ाशा परिसरावरही प्रशासन लक्ष ठेवू शकत नाही; की सर्व समोर घडत असतानाही त्याकडे डोळेझाक करीत आहे? असा प्र नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उत्खनन बंद असतानाही वाळूचे उत्खनन होते कसे? याकडेही महसूलयंत्रणा दुर्लक्ष करीत आहे.

या पूर्वी तहसीलदारावर हल्ला
वाळु माफियांनी 31 मे 2011 रोजी भडगाव तालुक्यात तहसीलदार इंदीरा चौधरी यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन ठार मारण्याचा प्रय} केला होता. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ते ट्रॅक्टर माझे नाही : पाटील
संतोष पाटील यांनी हे ट्रॅक्टर आपल्या मालकीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रॅक्टर कुणाचे आहे, याचा तपास पोलिसांनी करावा, असे आव्हानही पाटील यांनी दिले आहे.

भाजप जळगाव महानगरतर्फे निवेदन
अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात प्र उपस्थित करावा, अशा मागणीचे निवेदन बुधवारी भाजपच्या महानगर शाखेतर्फे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगार खुलेआम सुरू आहे. पोलिस, महसूल आणि आरटीओ विभागातर्फे या धंद्यांना छुपे सहकार्य केले जात आहे. तिन्ही विभागांना हप्ते पुरवले जात असून याची चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. अशोक लाडवंजारी, दीपक फालक, अमित भाटिया, डॉ. अश्विन सोनवणे, अँड. सत्यजित पाटील, चंदन महाजन, किशोर चौधरी यावेळी उपस्थित होते.

ठार मारण्याचा गुन्हा दाखल
या घटनेसंदर्भात घनश्याम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी औट पोस्ट ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या प्रय}ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, सुरवाडे यांना धडक देणारे ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे असून, त्याच्या ट्रॉलीचा क्रमांक एमएच-19/एएन-6836 असा आहे. तसेच दुसर्‍या एका ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच-19/एएन-3489 असा आहे. दोन्ही ट्रॅक्टरचे मालक वेगवेगळे आहेत. सुरवाडे यांना धडक देणार्‍या ट्रॅक्टरचा मालक अनोळखी असल्याची नोंदही फिर्यादीत करण्यात आली असून, दुसर्‍या ट्रॅक्टरचा मालक रवींद्र विक्रम हटकर हा आहे. त्यामुळे रवींद्रसह दोन्ही ट्रॅक्टरचे चालक आणि सुरवाडे यांना धडक देणार्‍या ट्रॅक्टरचा मालक अशा तिन अनोळखींवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक एन.जी.बनकर तपास करत आहेत.

दोन जणांना अटक
हरीविठ्ठल नगरात रमेश काशिनाथ सोनवणे (वय 22), गुलाब बाबुराव मोरे (वय 25) यांना पोलिस निरीक्षक बनकर, हवालदार अतुल वंजारी, खुशाल पाटील, सुधाकर भालेराव यांनी रात्री 10.30 ताब्यात घेतले.