आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडलाधिकारी, ३ तलाठ्यांच्या अंगावर घातले डंपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाळूचोरी करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडलाधिकार्‍यासह तीन तलाठ्यांच्या अंगावर दोन वेळा वाळूचे डंपर घालण्याचा प्रयत्न शनिवारी रात्री जळगाव जिल्ह्यात झाला. याप्रकरणी रविवारी डंपरमालक जनार्दन काेळी, चालक राजू काेळी, धनराज कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

म्हसावदचे मंडलाधिकारी राहुल मधुकर चौधरी व तलाठी घनश्याम दिगंबर लांबोळे, आर.टी.वंजारी आणि के. एम. बागूल असे चौघांचे पथक शनिवारी रात्री शिरसोली, म्हसावद, लमांजन या भागातील वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत होते. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शिरसोली-मोहाडी रस्त्यावर एक डंपर वाळूचोरी करून शहराकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पथकाने डंपर अडवले. त्याचा चालक राजू आत्माराम कोळी व धनराज कोळी राग आला. धनराजने पथकाच्या अंगावर डंपर घातले व नंतर पलायन केले.