आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - गिरणानदीच्या पात्रातून आता दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु असून या वाळूची चक्क शहरातील प्रमुख चाैक,रस्ते आणि खुल्या जागांवर खुलेआम िकरकोळ
विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत. विशेष म्हणजे खुलेआम विक्रीच्या या गोरखधंद्यात पोलिसांची एक पंचकडी आणि काही राजकीय पक्षांचे
पुढारीही सहभागी आहेत.या मंडळींनी अधिकृरित्या वाळूचे ठेके घेण्याऐवजी चोरीछुपे वाळू उपसा करून १०० टक्के नफा कमवण्याचा नवा मार्ग अवलंबला आहे.जिल्हा
प्रशासनातील आधिकारी या खुलेआम अवैध विक्रीकडे सोयीस्कर डोळेझाक करीत आहेत.
शहरातील खुले भूखंड, खासगी प्लाॅट, महामार्गावरील समांतर रस्त्याची जागा अादी ठिकाणी वाळूचे रिटेल स्टाेअर्स उघडले अाहेत. त्यामुळे बंदीच्या काळातही मागेल
त्याला वाळू खरेदी करता येत अाहे. प्रशासनाने डाेळे मिटत ना हरकत दिल्याने गिरणेच्या पात्रातील रात्रीचा उपसा कमी झाला असून थेट दिवसाच वाळू उचलली जात अाहे.
महामार्गावरून वाळू वाहतूक हाेत असताना महसूलचे अधिकारी ट्रॅक्टर बघताच खिशातील माेबाइल काढत त्यावर खेळत बसतात अशी वस्तुस्थिती अाहे. वाळूच्या
व्यवसायात पाेलिस अाणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा थेट संबंध असल्याने महसूल विभागानेदेखील साेईस्कर भूमिका घेतली. कारवाईचा फार्स मात्र चुकता केला जात
अाहे.
पाेलिसकर्मचाऱ्यांचेही वाळूचे डंपर
पाेलिसठाण्यात काॅन्स्टेबल असलेल्या पाच जणांचे १० ते १२ डंपर, सात ट्रॅक्टर दिवस-रात्र वाळूचा उपसा करतात. या ट्रॅक्टरची लाइन लावण्यासाठी शहरातील विविध सहा
ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी खासगी कट्टे तयार केले अाहेत. गणेश काॅलनीतील पेट्राेलपंपाच्या बाजूला साईबाबा मंदिरासमाेरील चहाच्या टपरीजवळील कट्ट्यावरून दाेन पाेलिस कर्मचारी त्यांचे पंटर सकाळी १० वाजेपर्यंत स्वत: बसून डंपरची लाइन लावतात. समाेरच्या पेट्राेलपंपावर िडझेल भरल्यानंतर गाड्या रवाना केल्या जातात. लांबच्या
प्रवासासाठी रात्री तर शहरातील वाळूसाठी दिवसा ट्रॅक्टर भरले जातात. मजुरांचे पेंमेंट, येणाऱ्या जाणाऱ्यावर येथूनच लक्ष ठेवले जाते. दाेन ते तीन माेबाइल घेऊन एक अा
ॅपरेटर सतत सर्वांच्या संपर्कात असतात. पिंप्राळा, प्रभात चाैकातील महाराणा प्रताप पुतळा, अाकाशवाणी चाैक येथे पंटरांकडून ग्राहकांचा शाेध घेतला जाताे. ग्राहकाशी
व्यव्हार झाल्यानंतर त्यांना वाळू पाेहचविण्यात येते.
एका डंपरमागे दरराेज ४० हजार कमाई
वाळूधंद्यातील कमाई डोळे गरगरवणारी आहे. त्यामागचे गणित असे. वाळूच्या एका डंपरमागे साधारणत: दोन हजार रुपयांचा खर्च होतो. यामध्ये डिझेल,वाहतूक आणि
कामगारांची रोजंदारी याचा समावेश आहे. एक डंपर १० हजार रुपयांना विकले जाते.म्हणजे प्रत्येक डंपरमागे साधारणत: हजार रुपयांचा नफा होतो. दिवसभरात एक डंपर
किमाने पाच फेऱ्या होतात. म्हणजे दिवसभरात एका डंपरमागे ४० हजारांची बक्कळ कमाई होते.महिनाभरात १२ लाख रुपयांचा नफा.प्रशासनाने कारवाई केल्यास ४० हजार
रुपयांचा दंड ठोठावते.अशी कारवाई महिनाभरात दोन वेळा होते.दंडापोटी ८० हजार चुकते केले तरीही एका डंपरमागे वाळू सम्राटाला सुमारे ११ लाख २० हजारांची कमाई
होते.
राजकीय पदाधिकाऱ्यांचीही वाहने
भाजप,राष्ट्रवादी अाणि शिवसेनेच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी वाळूच्या व्यवसायात विशेष लक्ष घातले अाहे. पाेलिस अाणि पुढारींच्या युतीला बाहेरून पाठिंबा दिल्याची
स्थिती अाहे. वाळू तस्करीवर वचक असल्याचे दाखवण्यासाठी १५ दिवस किंवा महिन्यातून एखाद दुसरी कारवाई हा महसूल विभागाचा नियम वाळूसम्राटांनी मान्य केल्याची
स्थिती अाहे. प्रत्यक्ष वाळू उपसा, वाहतूक, मार्केटिंग, इतर व्यवस्था अशा पातळ्यांवर वाळूचा व्यवसाय सुरू अाहे. महसूल विभाग पंधरवड्यातून तर पाेलिस दर शनिवारी
हीशेब पूर्ण करीत असल्याचे एका राजकीय पदाधिकाऱ्याने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.