आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसाेबत काडीमाेडचा संघाने घेतला हाेता निर्णय, सहधर्मजागरण प्रमुख ढाेलेंचा गाैप्यस्फाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘गुजरातमधील निवडणुकीवेळी भाजप अाणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वाद टाेकाला गेले हाेते. त्यामुळे काडीमाेड घेत माेदींसाेबत काम न करण्याचा निर्णय संघाने घेतला हाेता. मात्र, भाजपचा पराभव हिंदुत्वाचा पराभव झाल्याचा संदेश देशात जाईल, याची चिंता असल्याने संघाने गुजरात पिंजून काढला अाणि माेदींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केले’, असा गाैप्यस्फाेट संघाचे अखिल भारतीय सहधर्मजागरण प्रमुख शरदराव ढाेले यांनी शुक्रवारी जळगावात केला.

दिवंगत संघसाधक मुकुंदराव पणशीकर यांच्या स्मृतीग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी ढाेले यांनी संघ, हिदुत्व, भाजप-शिवसेना अाणि पणशीकर यांच्याशी संबंधित अातापर्यंत बाहेर न अालेल्या बाबींचा उलगडा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खराब हवामानामुळे कार्यक्रमाला येऊ न शकल्याने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते पणशीकरांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात अाले.

ढाेले म्हणाले, ‘भाजपसाेबत वाद टाेकाला गेल्याने गुजरातमधील निवडणुकीत प्रचार करायचा नाही, असा निर्णय संघाने घेतला हाेता. मात्र, तेथे भाजपचा पराभव झाल्यास देशात हिंदुत्वाचा पराभव झाला, असा संदेश जाईल हे लक्षात अाल्याने संघसाधक मुकुंदराव पणशीकर यांनी भाजपच्या काेअर कमिटीसाेबत बैठक घेऊन प्रचार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील वाद मिटवा, बाहेर येऊ देऊ नका, अशी त्यांची भूमिका हाेती. पणशीकरांनी पायाला भिंगरी लावून गुजरात पालथे घातल्याने माेदी दुसऱ्यादा मुख्यमंत्री हाेऊ शकले. या विजयानंतर माेदी- पणशीकरांची भेट झाली, त्या वेळी मोदी म्हणाले होते की, तुमच्यामुळे १३ जागा वाढल्या, अाणखी प्रचार केला असता तर ७ जागा वाढल्या असत्या. मात्र, त्या भेटीनंतर पणशीकर कधीही माेंदीना भेटले नाहीत.’
पुढे वाचा..
> शिवसेनेशी युती तुटल्याचा पणशीकरांना आनंद
बातम्या आणखी आहेत...