आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचे अाराेग्य, शिक्षण अन‌् सामाजिक समरसतेला प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काळानुरूप बदल स्वीकारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गणवेशात बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला अाहे. तथापि, राजस्थानातील नागौर येथील संघाच्या ज्या बैठकीमध्ये गणवेशबदलाचा निर्णय घेण्यात अाला, त्याच बैठकीत संघाने अाराेग्य, शिक्षण अाणि सामाजिक समरसतेसंदर्भात विशेष काम करण्याच्या विषयावर चर्चा करून त्यादृष्टीने काम हाती घेण्यासाठीचा ठराव पारित केला अाहे. ११ ते १३ मार्चदरम्यान नागाैर येथे झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी बैठकीस १,०५८ प्रतिनिधी उपस्थित राहिल्याची माहिती संघाचे पश्चिम क्षेत्र धर्मजागरणप्रमुख बाळासाहेब चाैधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चांगले अाराेग्य अाणि सुलभ अाराेग्यविषयक सुविधा निर्माण हाेण्यावर संघाने या राष्ट्रीय प्रतिनिधी बैठकीत भर दिला. जनतेची जीवनशैली अाराेग्यदायी हाेण्यासाठी अाहारविहार, याेग स्वच्छतेसंदर्भात स्वयंसेवकांमार्फत जनजागृती करावी, जेनेरिक अाैषधांची विक्री वाढवावी, ग्रामीण भागात अाराेग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, कुपाेषण व्यसनमुक्तीसंदर्भात काम करावे याबाबत ठराव झाल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएमच्या अामदारांनी ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, चाैधरी यांनी जावेद अख्तर यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. तसेच देशाचा जयघाेष करणे हा अधिकार असल्याचे अख्तर म्हणाल्याने हा विषय मानसिकतेचा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अविनाश नेहेते, स्वानंद झारे, विभाकर कुरंभट्टी उपस्थित हाेते.

माफक शुल्कात शिक्षण मिळावे
सर्वांनागुणवत्तापूर्ण अाणि माफक शुल्कात शिक्षण मिळावे, प्राथमिक अाणि माध्यमिक शिक्षण कमी खर्चामध्ये उपलब्ध झाले पाहिजे भारतीय परंपरांचे पालन करत सामाजिक समरसता टिकवण्यासाठी जनजागृती करण्यावर संघाच्या स्वयंसेवकांचा भर राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात अाली. गेल्या वर्षांत संघाच्या शाखांमध्ये वाढ झाली अाहे. देशभरात ५,५२४ शाखा वाढल्या असून, दर महिन्याला १० हजारांपर्यंत स्वयंसेवक संघाशी जाेडले जात असल्याची माहितीही चाैधरी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...