आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघमित्रा महिला मंडळातर्फे ‘स्वर विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - संघमित्रामहिला मंडळातर्फे ‘स्वर विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा’ हा समाजप्रबोधनपर कार्यक्रम रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नुकताच झाला.
अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी लभाणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ज्योत्स्रा मेश्राम, प्रा. छाया नेतकर उपस्थित होत्या. भंते सुगंतवंस महाथेरो यांनी उपदेश केला. कलावंत योगिता चौधरी, जयश्री पाटील, योगेश शिरसाठ, कल्पेश देशमुख यांच्या उत्तर महाराष्ट्र पुरोगामी विचार संघटनेतर्फे समाजप्रबोधनपर गीत गायन करण्यात आले. किरण बनकर यांंनी सूत्रसंचालन केले. शालिनी बोरकर यांनी आभार मानले.गीत गायन करताना योगिता चौधरी. साथसंगत करताना कल्पेश देशमुख सहकारी.