आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीता धायगुडे धुळे मनपाच्या नव्या अायुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर नगरविकास विभागाने अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांची सव्वा वर्षातच उचलबांगडी झाली अाहे. त्यांच्या बदलीचे अादेश गुरुवारी महापालिकेला मिळाले. त्यात १६ जूनपर्यंत डाॅ. भाेसले यांना पदभार साेडण्याचे अादेश देण्यात अाले. मात्र, त्यांनी पदभार साेडलेला नाही. नवीन अायुक्त म्हणून संगीता धायगुडे यांची नियुक्ती झाली अाहे. डाॅ. भाेसले यांच्याबराेबर उपायुक्त डाॅ. प्रदीप पठारे यांचीही बदली झाली अाहे.

महापालिकेत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी मित्र पक्षांच्या सहकार्याने आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर भोसले यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले. शासनाने संगीता धायगुडे यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे अादेश दिले आहे. त्याचप्रमाणे आयुक्त डॉ. नामदेव भाेसले यांना १६ जूनला कार्यमुक्त करण्यात आले असून, सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना पुढील आदेश येणार आहे. तोपर्यंत त्यांची सेवा सामान्य प्रशासन विभागाकडे सुपुर्द करावयाची आहे. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या जागेवर नियुक्त झालेले चाळीसगाव येथील रवींद्र जाधव यांना १६ जूनला कार्यमुक्त करण्यात आल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. डॉ. नामदेव भाेसले यांना नियुक्त होऊन एक तर उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना मनपात चार वर्षांचा कालावधी झाला होता.

राष्ट्रवादीने फोडले फटाके
आयुक्तडॉ. नामदेव भोसले उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची बदली झाल्याचे कळताच राष्ट्रवादीने मनपाच्या आवारात फटाके फाेडून अानंद व्यक्त केला. या वेळी महापौर जयश्री अहिरराव, उपमहापौर फारुक शाह, स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, नगरसेवक मनोज मोरे, कशीश उदासी, अहिरराव उपस्थित होते.

जळगाव महापालिकेच्या २८वे अायुक्तपदी किशोेर बाेर्डे यांची, तर उपायुक्तपदी राजेंद्र फातले यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. दाेघेही मालेगाव महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी अाहेत. विद्यमान अायुक्त संजय कापडणीस यांची पदस्थापना झालेली नाही. उपायुक्त प्रदीप जगताप यांची अचलपूर (जि. अमरावती) येथे बदली करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...