आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया कादरीला आज न्यायालयात हजर करणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - समीर पिंजारी याच्यावर गोळीबारप्रकरणी पोलिस कोठडीत असलेली बांधकाम व्यावसायिक सानिया कादरीसह पाच संशयितांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी तपासाधिकारी दिलीप पगारे यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह अन्य अधिका-यांचे जबाब नोंदविले आहे. पाच जानेवारी रोजी बसस्थानकाजवळ सानिया कादरीने गोळीबार केल्याने त्यात समीर पिंजारी हा गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सानियासह तिचे अंगरक्षक, वडील, आई, भाऊ, बहीण अशा आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या पोलिस कोठडीनंतर सानियाची आई, भाऊ व बहीण यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर सानिया, तिचे वडील सय्यद कादरी, मनोज वालेचा, अंगरक्षक मोहंमद जमाल, आमीर खान यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे.