आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अधिकारी १० वर्षांपासून रस्त्यांची करताहेत सफाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पंतप्रधानांनी‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा करताच प्रसिद्धीसाठी भल्याभल्यांनी झाडू हातात घेतले. मात्र, संत गाडगेबाबांच्या कामापासून प्रेरणा घेणारे जिल्हा परिषदेतील निवृत्त अधिकारी शिवाजी पाटील गेल्या १० वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतेच्या कामात रमत आहेत. या निवृत्त अधिकाऱ्याचे वास्तव्य असलेल्या गणेश कॉलनी परिसरातील तीन गल्ल्यांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना येण्याची गरज पडत नाही.

मूळचे आसोदा येथील रहिवासी असलेले रायगड जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या शिवाजी दोधू पाटील या ७४ वर्षीय अधिकाऱ्याचे वास्तव्य गणेश कॉलनीत आहे. सुरुवातीपासून समाज कार्याची आवड असल्याने त्यांनी लग्न केले नाही. संत गाडगेबाबांच्या कामापासून प्रेरणा घेत त्यांनी शासकीय सेवेत असतानाही स्वच्छतेचा वसा हाती घेतला होता. निवृत्तीनंतर जळगावातील गणेश कॉलनी परिसरात ते १० वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. या ठिकाणी रिकामा वेळ समाजकार्यात जावा म्हणून त्यांनी हाती झाडू घेतला. सकाळी सहा वाजताच ते घराबाहेर पडतात. जाताना शेजारच्यांचा भाजीपाला किंवा काही वस्तू हव्या असल्यास त्याची यादी करून परतताना ते आणून देतात. याचा कोणताही मोबदला किंवा जाण्या-येण्याचे भाडेही ते घेत नाहीत. दुपारी वाजेपासून सायंकाळी ते वाजेपर्यंत झाडू हातात घेऊन सुमारे तीन किलो मीटर रस्ता स्वच्छतेचे काम ते करतात. या परिसरातील गटारी लगतचे गवत, झाडांच्या वाढलेल्या फांद्या, वेळप्रसंगी नागरिकांच्या घरात भरलेल्या डसबीन घंटागाड्यांमध्ये उपसण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाते. त्यांच्या या कामामुळे परिसरातील नागरिकांना ते आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाटतात.
१० वर्षांपासून शिवाजी पाटील स्वच्छतेची कामे करतात. याच्या मोबदल्यात ते चहाची देखील अपेक्षा ठेवत नाहीत. उषामहाजन, रहिवासी

‘प्रत्येक दिवस स्वच्छतेचा’ दिव्य मराठी’ची मोहीम
स्वच्छताअभियानात आपलाही खारीचा वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते.परंतु नेमके सुरुवात कशी आणि कुठून करायची असा प्रश्न पडतो.चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी अशी म्हण आहे.त्याच धर्तीवर स्वच्छता अभियानाची सुरुवात आपण आपल्या परिसरापासून करू या. तुम्ही एवढेच करा आपल्या परिसरात,गल्लीत,कॉलनीत कचरा असल्यास त्याचा फोटो आमच्याकडे पाठवा.आम्ही तो फोटो आपल्या भागातील लोकप्रतिनिधीकडे पाठवू.त्यांनी परिसर स्वच्छ केल्यास त्याला प्रसिद्धी देऊ. किंवा आपण पुढाकार घेऊन आपल्या भागात स्वच्छता अभियान राबवल्यास आम्ही त्यालाही ठळक प्रसिद्धी देऊ.स्व्वच्छतेचे फोटो dmjalswachha@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा ७५८८८१३०८२आणि७८७५७१७८८१यामोबाइल क्रमांकावर व्‍हॉट‌्सअॅपने पाठवू शकता. फोटोखाली आपला परिसर आणि नगरसेवकाचे नाव, मंडळ, सोसायटी, आस्थापना, ग्रुपचे नाव नमूद करावे. टीप - मोबाइलने काढलेले फोटो शक्यतो पाठवू नयेत. कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंना प्राधान्य देण्यात येईल.