आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या वरिष्ठांकडे सोपवली स्वच्छता अभियानाची धुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वे प्रशासनातर्फे १७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान सप्ताह राबवले जात आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागातील मोठ्या रेल्वेस्थानकांवर स्वच्छता अभियान राबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभियानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी भुसावळ जंक्शनवर पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. रेल्वेस्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. रेल्वे मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ संकल्पनेतून स्वच्छता अभियान सप्ताहाची आखणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून भुसावळ विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर सफाई अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.
डीअारएम कार्यालयातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठी रेल्वेस्थानके विभागून देण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधित स्थानकावरील स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे दिली आहे.

नऊ दिवसांचे अभियान : ‘स्वच्छरेल स्वच्छ भारत’संकल्पनेतून १७ ते २५ सप्टेंबर या काळात राबवल्या जाणाऱ्या अभियानातून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकासह रेल्वे कर्मचारी निवासस्थान परिसरातही स्वच्छतेवर लक्ष केंद्रित आहे.
याअधिकाऱ्यांची नियुक्ती : वरिष्ठविभागीय अभियंता दिनेश गजभिये (मनमाड), वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा (जळगाव), वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक नरपतसिंग (भुसावळ), एस.के.राजुला (बडनेरा), अजय टेकाडे (खंडवा), एस.के.सिन्हा (बऱ्हाणपूर), डाॅ. तुशाबा शिंदे (चाळीसगाव), एन.जे. निमजे (अकाेला), अार.पी.चाैहान (अमरावती), व्ही.टी.कदम (शेगाव).

नाटिकेद्वारे जनजागृती
गुरुवारी भुसावळ जंक्शनवर रेल्वे स्कूलच्या स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती केली. जंक्शनवरील प्लॅटफाॅर्म तीनवर नाटिकेचे सादरीकरण झाले. डीअारएम सुधीरकुमार गुप्ता, वरिष्ठ अभियंता ए.के.सिंग, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, दिनेश गजभिये, श्याम कुळकर्णी, एम.जगदीश, स्टेशन व्यवस्थापक अार.के. कुठार अादी उपस्थित हाेते. फलाटावर उभ्या असलेल्या गाडीतील प्रवाशांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. रेल्वे स्कूलचे शिक्षक सतीश कुळकर्णी, शशिकांत साखरे, अाकांक्षा शुक्ल, राजेंद्र जावळे यांनी विद्यार्थ्यांना अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी ओळखावे
^प्रत्येक रेल्वेप्रवाशाने रेल्वेस्थानकासह अापण प्रवास करत असलेल्या रेल्वेतील डबा स्वच्छ ठेवल्यास अभियान हेतू सफल होण्यास विलंब लागणार नाही. तसेच स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. सुधीरकुमार गुप्ता, डीअारएम, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...