आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय सावकारे झाले जिल्ह्याचे पालकमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावच्या पालकमंत्रीपदी नवनिर्वाचित कृषी राज्यमंत्री संजय सावकारे यांची गुरुवारी निवड करण्यात आली. सावकारेंसह पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद डॉ.विजयकुमार गावित यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र पक्षाने संजय सावकारे यांना ही संधी दिली आहे. निवडीचे वृत्त कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.