आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Savkare Talk On Jagan Sonawane Case In Bhusawal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धमक्यांना भीत नाही : पालकमंत्री संजय सावकारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - जगन सोनवणे पालिकेत असोत किंवा नसोत, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यांचे नगरसेवकपद अपात्रताप्रकरणी माझा कवडीचा सुद्धा संबंध नाही. सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरूद्ध न्यायालयात जावे. आपण कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय सावकारे यांनी दिली.

जिल्हाधिकार्‍यांनी पालिकेतील स्वीकृत सदस्य जगन सोनवणे यांचे नगरसेवकपद रद्द केले. यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांवर दबाव टाकून आपले पद रद्द केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला होता. त्यांच्या सर्मथकांनी तर पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, हे प्रकरण शांत होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पालकमंत्र्यांचे बंधू प्रमोद सावकारे यांना क्वॉइन बॉक्सवरून निनावी व्यक्तीने धमकी देत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. या सर्व घडामोडींबाबत पालकमंत्री सावकारे यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना भूमिका स्पष्ट केली.

सध्या अधिवेशन सुरू असल्याने मी मुंबईत आहे. सोनवणे यांची तक्रार मी केलेली नाही. दुसर्‍या अन्य व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी निकाल दिला. तरीही माझे नाव विनाकारण घेतले जाते. सोनवणे यांनी गैरसमज केला आहे. मला पालिकेच्या घाणेरड्या राजकारणात भाग घेण्याची मुळीच इच्छा नाही. सोनवणे यांचे पद अपात्र करून मला फायदा काय? ते पालिकेत असले काय किंवा नसले काय? मला त्यांच्याशी काहीही देणे घेणे नाही.भावाकडे 25 लाख खंडणी मागण्यात आली. मात्र, आपण कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही, असे सावकारे म्हणाले.

दरम्यान, पालकमंत्र्यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी त्यांचे सर्मथक नगरसेवकही चांगलेच आक्रमक झाले आहे. युवराज लोणारी आणि सहकार्‍यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात निवेदन देत याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली.