आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताच्या तालावर नाचणारा सांता बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिंगलबेल जिंगल बेल... म्हणत, हसत खेळत आपल्या सोबत भेटवस्तूंसह आयुष्यात आनंद देणारे सांताक्लॉज बाजारात दाखल झाले आहेत. यात विशेषत: म्युझिकल सांता बाजारात पाहायला मिळत आहेत.
ख्रिश्चन बांधवांतर्फे नाताळ पुढील आठवड्यात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात अनेक वस्तू आल्या आहेत. सांताक्लॉजच्या मूर्ती, बेल, ट्री, स्टार, चमकी असे विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये खासकरून म्युझिकल टोन असणाऱ्या वस्तूंची क्रेझ दिसून येत आहे.
सजवलेलेट्री
नाताळमध्येझाडांची सजावट केली जाते. त्यामुळे बाजारात असे सजवलेले वृक्षही विक्रीस आलेले आहेत. या झाडांना चमकीचे बॉल, बेल, स्टार लावण्यात आले आहेत. यात चॉकलेटदेखील लावू शकतात. घराच्या दारातही आपण ठेवू शकतो, असे हे आर्टिफिशियल झाड आहे.
मास्क,थ्री-डी स्टिकर्स
लहानमुलांना आकर्षित करण्यासाठी थ्री-डी स्टिकर्स आहेत. ही रंगीबेरंगी स्टिकर्स असून यामध्ये साध्या घरात लावणारे, चमकणारे स्टिकर्सही आहेत. तसेच बॅटरी ऑपरेटिंग सांता, वाद्य वाजवणारा, नाचणारा, बंगल्यातून बाहेर येणारा, गाणी म्हणणारा, गॉगल घातलेला सांताक्लॉज आहे. मुलांना सांताची वेशभूषा साकारायची असल्यास त्यासाठी सांताचे मास्क तयार केले आहेत. लायटिंगचे सुद्धा सांता आहेत. तसेच लहान सांताच्या मूर्तीदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच येशुख्रिस्ताची पूर्ण फॅमिलीसुद्धा आहे