आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौधरींनी ‘मातोश्री’ वर शिवबंधन बांधून केला शिवसेनेत केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राष्ट्रवादी चेमाजी आमदार संतोष चौधरी यांनी बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ वर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत पाच प्रमुख कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. उर्वरित कार्यकर्ते जिल्ह्यात होणा-या एका मेळाव्यात प्रवेश करणार आहेत.

या वेळी शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. माजी आमदार संतोष चौधरी, सचिन चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्यडॉ.वसंतराव झारखंडे, कैलास महाजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामदास सावकारे या पाच जणांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे अाणि संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. दरम्यान, पालिकेतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबतच असल्याचे नगराध्यक्ष पिंजारी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.