आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Choudhari News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

संतोष चौधरींना झाली जुन्या घराची आठवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात नवशक्ती ऑर्केडजवळ राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी सवाद्य झाले. त्यात माजी आमदार संतोष चौधरी यांनी आवेशात भाषण करताना ‘शिवसैनिक’ शब्दातील शिवचा उच्चार केला, मात्र, सैनिक शब्द उच्चारण्यापूर्वीच जीभ आवरती घेतली. त्यांची ही कृती म्हणजे जुन्या घराची (शिवसेना) आठवण हृदयात कायम असल्याची प्रचिती देणारी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थितांमधून दबक्या आवाजात चर्चिला गेला.
भुसावळच्या राष्ट्रवादीत सावकारे व चौधरी असे दोन गट असल्याच्या विषयावर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचे कारण म्हणजे मंगळवारी पांडुरंग टॉकीजसमोर ज्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले तेथे फक्त सावकारेंना मानणारा गट उपस्थित होता. तसेच बुधवारी नवशक्ती ऑर्केडजवळच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले तेथे संतोष चौधरींना मानणारा गट हजर होता. या वेळी खासदार ईश्वरलाल जैन यांनी चौधरींचा उल्लेख सेनापती असा करून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. जैन यांच्या भाषणाचा धागा पकडून चौधरींनीही जोशात भाषण केले. मात्र, ते करत असताना त्यांना कार्यकर्त्यांना सैनिक संबोधायचे होते हे खरे. परंतु तत्पूर्वी त्यांनी ‘शिव’ असा उल्लेख करून आणि दोन सेकंदाचा ब्रेक घेऊन कार्यकर्त्यांना सैनिकाची उपमा दिली. अनावधानाने त्यांच्या जीभेवर आलेले हे शब्द म्हणजे आपण पूर्वार्शमीचे शिवसैनिक आहोत, असे तर सांगत नसतील ना? चौधरी यांनी आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात चौफेर टोलेबाजी करताना सांगितले की, मैदान सोडून पळ काढणे हा आपला धर्म नाही. कितीही संकटे आली तरी ती परतवून लावण्याची तयारी आहे.
आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते
नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. गद्दारी आमच्या रक्तात नाही. कोणी काहीही अफवा पसरवली तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जो झेंडा खांद्यावर घेतला आहे तो डौलाने फडकत राहावा, याकडेच आमचे लक्ष आहे, अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.