आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’मुळे सराफा बाजारात मंदी, व्यवहार 25 ते 30 टक्क्यांनी थंडावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रत्येक व्यवसायाचा मंदी अाणि तेजी कालावधी असताे. त्याप्रमाणे जून ते अाॅगस्ट हे तीन महिने सराफ बाजारात मंदी असते. मात्र, यंदाच्या मंदीत जीएसटीमुळे अधिक भर पडली अाहे. जीएसटीनंतर सराफ बाजारातील व्यवहार २५ ते ३० टक्क्यांनी थंडावले अाहेत.
 
सणवार, लग्नसराई अाणि शेतकऱ्यांचा हंगाम येणाऱ्याचा कालावधी हा सप्टेेंबर ते मे असा असताे . यासाेबत शासकीय कर्मचाऱ्यांना अायाेगाच्या फरकाची रक्कम मिळणे, गुरुपुष्य अमृत याेग अादीमुळे व्यवसायात वृद्धी हाेत असते. गेल्या वर्षी दिवाळीतील व्यवसाय सराफ बाजाराला अाधीच्या वर्षाच्या तुलनेत चांगला हाेता. त्यानंतर लगेचच झालेली नाेटबंदीत अनेकांनी साेन्यात माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, त्यामुळे माेठ्या प्रमाणावर व्यवहार झालेत. मात्र, त्यानंतर जवळपास दाेन अडीच महिने सराफ बाजार शांत हाेता. त्यानंतरच्या एप्रिल, मे, जूनच्या लग्नसराईतही चांगली उलाढाल झाल्याचे जाणकार सांगतात. पाठाेपाठ शेतीचा हंगामही सर्वत्र चांगला झाल्याचे सुवर्ण बाजारात तेजीचा सकारात्मक परिणाम जाणवला.
 
जीएसटीअाधी वाढली हाेती खरेदी : केंद्रसरकारकडून जीएसटी लागू करणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्यात साेन्यावर माेठ्या प्रमाणावर करवाढीची शक्यता गृहित धरून अनेकांनी अागामी लग्नसराई डाेळ्यासमाेर ठेवून खरेदी केली. हा खरेदीचा अाेघ एवढा अधिक हाेता की अाठवडाभर रात्री साडेदहा वाजेपर्यंत सराफीपेढ्या सुरू हाेत्या. काही शाेरूम शेवटचे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत सुरू हाेते.
 
साेन्यावरील करात तीनपट वाढ
पूर्वीताेळे साेन्याला ३० हजार भाव गृहीत धरल्यास ग्राहकाला ३२० रुपये कर लागत हाेता. जीएसटीनंतर त्याला ९०० रुपये कर भरावा लागणार अाहे.
 
जीएसटीचा प्रभाव जाणवताेय
दरवर्षी जून ते अाॅगस्ट हे तीन महिने सराफ बाजारात व्यवहार तुरळक हाेतात. मात्र, यंदा त्यात जीएसटीचाही प्रभाव जाणवत अाहे. जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी व्यवहार घटले अाहेत. त्यामुळे सराफात जवळपास व्यवहारच नाही अशी स्थिती अाहे.
- अजय ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफा असाेसिएशन
 
बातम्या आणखी आहेत...