आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सराफांच्या चित्राचा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कलर्ड पेन्सिल सोसायटी ऑफ अमेरिकातर्फे आयोजित २३व्या आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनात अमोल सराफ यांच्या ‘क्युटनेस अॅट इट्स बेस्ट' या चित्राला "अवॉर्ड आॅफ आउटस्टँडिंग अचिव्हमेंट’ने सन्मानित करण्यात आले आहे. कलर्ड पेन्सिल सोसायटी ऑफ अमेरिका ही रंगीत पेन्सिल या आर्ट मीडियममध्ये गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी रंगीत पेन्सिलमध्ये तयार केलेल्या चित्रांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात येते. या वर्षी हे प्रदर्शन आग्लेथोर्प युनिव्हर्सिटी म्युझियम आॅफ आर्ट, अटलांटा (जाॅर्जिया) येथे भरवले असून, त्यात ९० चित्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात फक्त कलाकृती अमेरिका देशाबाहेरील आहेत. कॅनडा, ग्रीस, मलेशिया आणि भारतातून सराफ यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. या प्रदर्शनातील फक्त १५ कलाकृतींना सन्मानित करण्यात आले. अमोल सराफ यांच्या कलाकृतीने ६वे स्थान पटकावले आहे. त्यांनी निरागस लहान चिमुकलीचे चित्र रंगवून त्यातील भाव हुबेहूब रेखाटले असून, या चित्राला ‘क्युटनेस अॅट इट्स बेस्ट' नाव दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...