आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी साडी नेसण्याचे प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आदर्श सिंधी सहेली महिला मंडळातर्फे शुक्रवारी संत हरदास राम मंगल कार्यालयात साडी ड्रेपिंग (साडी नेसणे) शिबिर घेण्यात आले. यात महिलांना विविध प्रांतांतील महिला परिधान करतात, त्या पद्धतीच्या साड्या नेसण्याची पद्धत शिकविण्यात आली. तसेच या वेळी मंडळाच्या महिलांसाठी फॅशन शो देखील झाला.

वुमन्स केअरच्या संचालिका वीणा मयारामानी यांनी साडी नेसण्याच्या पद्धती शिकविल्या. मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा बेहरानी व उषा जवाहरानी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख लाज आडवाणी होत्या. रजनी तौरानी, रेखा मतानी, वर्षा मंधान यांचे सहकार्य मिळाले.

20 प्रकारच्या साड्या
बंगाली मिक्स, इंडो वेस्टर्न साडी, साधी गुजराथी, मॉडर्न गुजराथी तसेच जुन्या काळातील मुमताज, फिश कट, घागरा स्टाइल, घागरा विथ वन प्लेट आणि साध्या साडीचे चार प्रकार शिकविण्यात आले. यात पदर आणि मिर्‍यांमधील प्रकार सांगण्यात आले. पार्टीवेअर साडी नेसणेदेखील शिकविण्यात आले. यावेळी साड्या नेसण्याचे एकूण 20 प्रकार शिकविण्यात आले.

या महिलांचा सहभाग
मंडळाच्या सल्लागार प्रेमा जवाहरानी, संगीता कटारिया, शोभा पारवानी, सुलोचना नाथाणी, वंदना मताणी, सोनल कुकरेजा, पूनम ददलानी, गौरी आहुजा, नितू मतानी, अंजली मतानी, जान्हवी तेजवानी, शोभा वालेचा यांनी सहभाग घेतला.