आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Patil News In Marathi, Nationalist Congress, Jalgaon, Divya Marathi

डॉ.सतीश पाटलांविरुद्ध ‘आचारसंहिता भंग’ची तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - स्व.बबनराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनपर भाषणात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आपने सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली. या तक्रारीनंतर डॉ.सतीश पाटलांसह आयोजकांकडून निवडणूक अधिकार्‍यांनी खुलासा मागितला आहे.


उर्दू शाळेत हनुमान जयंतीदिनी कुस्तीचा फड रंगला. डॉ. पाटील व आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते जोड लावून स्पर्धेचा प्रारंभ झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात डॉ.पाटील यांनी उपस्थितांना मते देण्याचे आवाहन केले. सार्वजनिक कार्यक्रमात जाहीररीत्या मते मागणे आचारसंहितेचे उल्लंघन असून या संदर्भात कारवाई करावी, अशी तक्रार आपतर्फे प्रा.गौतम निकम, डॉ.अजय पाटील, देवेंद्र पाटील, विनय चौधरी, योगेश्वर राठोड, भागवत पाटील यांनी केली आहे. तक्रारीच्या सर्व बाबी पडताळून आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई होईल. असे सहा. निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


काय म्हणाले होते डॉ.पाटील
कुस्तीला येथे मोठी परंपरा लाभली आहे. आचारसंहितेचा मान राखत जास्त बोलणे उचित होणार नाही. मात्र येत्या 24 तारखेला माझीही कुस्ती आहे.