आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • सातपुड्याला मदत गरजेची, उजाड माळरानाकडे होतेय वाटचाल

सातपुड्याला मदत गरजेची, उजाड माळरानाकडे होतेय वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - सुमारे १० वर्षांपूर्वी यावल अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १७७.५२ हेक्टर चौरस किलोमीटर होते. यापैकी सध्या १७५.५८ हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्र शिल्लक असून १.९४ हे. चौ.मी. क्षेत्र कमी झाले आहे.

कधीकाळी घनदाट जंगल असलेला सातपुडा आता अतिक्रमणामुळे उजाड माळरानासारखा झाल्याने तेथील वन्यजीव अस्तित्वाची लढाई लढत आहेत. सातपुड्याची ही दशा होण्याला वनहक्क कायद्याचा गैरवापरदेखील कारणीभूत आहे. मात्र, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी शासनदरबारी वजन खर्ची घातले, तर सातपुड्याची दशा पालटता येईल. ठोस कृती कार्यक्रम ठरवून सातपुड्याला पुन्हा हिरवेगार करता येईल.

आयएसएफचा रिपोर्ट धक्कादायक : केंद्रीयवन मंत्रालयाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ‘इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१३’ मध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील जंगल कमी होत असल्याचे म्हटले आहे. तरीही खान्देशातील सातपुड्याला वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित प्रयत्न होताना िदसत नाहीत.

नवाड पाटलांचा वावर : सन२००६मध्ये वनहक्क कायदा आला, तरीसुद्धा आठ वर्षांनंतर दावे का दाखल होत आहेत? प्रलंबित दाव्यांवर निर्णय कधी होईल? याचा विचार व्हावा. काही मंडळी आदिवासींच्या अज्ञानाच्या गैरफायदा घेत वनहक्क कायद्याचा दुरुपयोग करतात. जमिनीचे आमिष दाखवणारे अनेक नवाड पाटील उदयास आले आहेत.

अतिक्रमण काढले : फेब्रुवारी २०१४मध्ये यावल अभयारण्यात संचार बंदी लावून ५७६ हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. वन्यजीव विभागाचे नाशिक येथील तत्कालीन वनसंरक्षक एस. बी. शेळके यांच्या पुढाकाराने सहायक वनसंरक्षक एम.एन.खैरनार यांनी सुमारे २५० कर्मचार्‍यांच्या मदतीने ही मोहीम फत्ते केली होती.
बातम्या आणखी आहेत...